शहरं
Join us  
Trending Stories
1
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
3
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
4
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
5
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
6
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
7
स्वस्त पेट्राेल-डिझेल आता विसरा; युद्धाचे ढग; कच्च्या तेलाचे दर वाढले
8
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक
9
माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे निधन
10
नाेकऱ्या अन् पगारवाढही! पण, उत्पादन क्षेत्रातील वाढ नीचांकावर
11
मराठीला अभिजात दर्जासाठी अवघ्या 26 आमदारांनीच दाखविला रस
12
मानवरहित सौर ऊर्जा बोटीद्वारे कचरा संकलन; समुद्र होणार चकाचक
13
आहारामुळे विद्यार्थ्यांची आबाळ; शिक्षणमंत्री मध्यरात्री आले; झोपलेल्या मुलांना उठवून गेले
14
‘एमएमआरडीएचे अधिकारी संवेदनशील का नाहीत?’ आयुक्तांनी उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे
15
देहविक्रयासाठी थायलंडच्या मुलीचा पाच हजारांत सौदा; ठाण्यात चौघांना अटक
16
लोकसभेत महायुतीने भिवंडीत ‘सिंह’ गमावला आता गड राखण्याचे आव्हान
17
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
18
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
19
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
20
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा

विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

By admin | Published: July 25, 2016 12:33 AM

पृथ्वीराज चव्हाण : यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पेठवडगावात अनावरण

पेठवडगाव : सध्या राज्याला प्रामुख्याने पाणी आणि नागरीकरण हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. नागरीकरणाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर स्वर्गीय विजयसिंह यादव यांचे वडगावातील कार्य कौतुकास्पद असून, महाराष्ट्रात त्यांच्यासारखे चांगले काम अन्य कोणी केलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे काढले. स्वर्गीय विजयसिंह यादव पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. एसटी स्टँडजवळ विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. या चौकाला विजयसिंह यादव चौक असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, सुजित मिणचेकर, सतेज पाटील, उल्हास पाटील, आनंदराव पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्षा विद्या पोळ, विजयादेवी यादव, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात कोल्हापूर सोडले तर इतर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच नागरीकरणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारने सत्तेत असताना १३४ ग्रामपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा दिला. खेड्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही नगरपालिकांना मंजुरी दिली. वडगावचे भाग्यविधाते स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी ३२ वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले. या काळात वडगाव सुजलाम् सुफलाम् केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यांना वडगावच्या जनतेनेही भरभरून प्रेम दिले. विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या कन्या विद्या पोळ यांनी जपला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत विद्या पोळ यांच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, विजयसिंह यादव यांच्यासारखा माणूस होणे नाही. ३२ वर्षे नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडली आहे. विधान परिषदेला यादवसाहेब काँगे्रसच्या तिकिटावर उभारले होते; पण काँग्रेसने त्यांना मदत केली नाही; मात्र वारणा समूहाने प्रामाणिकपणे मदत केली. काँगे्रस पाठीशी राहिला असता तर यादवसाहेब आमदार झाले असते, असेही विनय कोरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, यादवसाहेबांना वडगावच्या जनतेने मोठी ताकत दिली. साहेबांनीही प्रत्येकाचा आदर राखला. येणारे प्रत्येक आव्हान हसतमुखाने पेलले. त्यांचे हे कार्य पुढे चालविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कार्यक्रमाचे स्वागत विद्या पोळ यांनी केले. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक सुनील हुकेरी यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार यशवंत पाटील, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजन शेटे, मुख्याधिकारी अतुल पाटील, संपत नायकवडी, आदींसह आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.