शाहूवाडी तालुक्यातील कासारी खोऱ्यात कासारी नदीला आलेल्या पुरामुळे करंजपेण बाजारपेठेत पाणी शिरून दुकानदाराचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तर करंजपेण गावालगत पेट्रोल पंपावर डोंगरातून भूस्खलन झाल्यामुळे पेट्रोलपंप गायब झाला आहे.
कासारी नदीला आलेल्या पुरामुळे करंजपेण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्यात पंचवीस नागरिक अडकले होते. जिल्हा बँकेचे संचालक सर्जेराव पाटील यांनी.............. बोटीच्या साहाय्याने बाहेर काढले. तर करंजपेण गावाजवळ असणाऱ्या नामदेव पवार यांच्या पेट्रोल पंपावर भूस्खलन झाल्यामुळे पेट्रोल पंप जमिनीत गाडला जाऊन सुमारे वीस कोटीचे नुकसान झाले आहे. करंजपेण बुरंबाळ, मरळे, इजोली, अणुस्कुरा आदी गावात भूस्खलनामुळे डोंगर कोसळून हजारो एकर शेती गायब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कासारी, कडवी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे.
फोटो....... करंजपेण गावालगत असणाऱ्या नामदेव पवार यांच्या पेट्रोल पंपावर दरड कोसळल्याने पेट्रोल पंप गायब झाला आहे .