सचिन भोसले ।कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीतून गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात दोन हिंदकेसरी, एक रुस्तम-ए-हिंद व युवराज पाटील यांच्यासारखे अकरा ‘महाराष्ट्र केसरी’ तयार करणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक संघटक पी. जी. तथा पांडुरंग पाटील राज्य शासनाच्या ‘शिवछत्रपती’ पुरस्कारापासून वंचितच राहिले आहेत.बांगडी या कुस्तीतील डावाबद्दल तरबेज असलेले पी. जी. पाटील यांनी गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ कुस्तीची सेवा केली आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन अनेक दिग्गजांनी पुढे हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, रुस्तम-ए-हिंद, आदी किताब पटकाविले आहेत. स्वत: त्यांनी १९७४ साली रशिया व भारत यांच्यातील मैत्रीपूर्ण लढतीत ५७ किलोगटात सहभाग घेऊन रशियन मल्लाला जेरीस आणले होते. यासह राज्य, राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरीही त्यांनी केली आहे. केवळ कुस्तीची सेवा करायची म्हणून जिल्हा परिषदेतील निवृत्तीनंतर ते विनामानधन अनेकांना मोतीबाग तालीम येथे आजही प्रशिक्षण देत आहेत. पाटील यांनी मार्गदर्शन केलेल्या १९६७ सालच्या चंबा मुत्नाळ यांच्यापासून ते अगदी २०१० साली ‘महाराष्ट्र केसरी’ झालेल्या समाधान घोडके यांचा समावेश आहे. मात्र, इतक्या वर्षांच्या कुस्तीच्या सेवेनंतरही त्यांच्या कार्याची दखल राज्याच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाने घेतलेली नाही. विचारणा व प्रस्ताव देण्यासाठी क्रीडा व युवा संचालनालयाकडे गेले असताना त्यांना गेल्या दोन वर्षांतील कामगिरी विचारली जात आहे. त्यामुळे आजतागायत ते ‘शिवछत्रपती’सारख्या पुरस्कारांपासून वंचित राहिले आहेत.यांना केले मार्गदर्शनहिंदकेसरी चंबा मुत्नाळ (‘महाराष्ट्र केसरी’ दोन वेळा १९६७, १९६८), रुस्तम-ए-हिंद दादू चौगुले (‘महाराष्ट्र केसरी’ दोन वेळा १९७०, १९७१), ‘महाराष्ट्र केसरी’ युवराज पाटील (१९७४), हिरामण बनकर (१९७६), विष्णू जोशीलकर (१९८५), गुलाब बर्डे (१९८६), धनाजी फडतारे, हिंदकेसरी विनोद चौगुले (महाराष्ट्र केसरी १९९६), समाधान घोडके (२०१०), आदींनापी.जीं.नी मार्गदर्शन केले आहे.गेल्या ५० वर्षांहूनच्या काळात मी ‘अर्जुनवीर’ गणपतराव आंदळकर, ‘महाराष्ट्र केसरी’ युवराज पाटील, ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले, ‘हिंदकेसरी’ चंबा मुत्नाळ, विनोद चौगुले, आदींना मार्गदर्शन केले आहे. सरकार माझ्या कार्याची दखल घेवो अथवा न घेवो; माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी कुस्तीची सेवा करीत राहीन.- पी. जी. पाटील, ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक
दिग्गज मल्ल घडविणारे ‘पी.जी.’ ‘शिवछत्रपती’पासून वंचितच : ‘बांगडी’ डावाबद्दल मोठा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 1:02 AM
कोल्हापूर : कोल्हापूरच्या मातीतून गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळात दोन हिंदकेसरी, एक रुस्तम-ए-हिंद व युवराज पाटील यांच्यासारखे अकरा ‘महाराष्ट्र केसरी’ तयार करणारे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक संघटक
ठळक मुद्देपन्नास वर्षांचे परिश्रम