फलटण : तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी ६७ तर पंचायत समितीसाठी १०५ अर्ज दाखल झाले आहेत. यात निंबाळकर घराण्याचे तब्बल पाच उमेदवार आहेत. एकूण जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी ९४ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी १५१ अर्ज दाखल झाले असून, अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक सर्वांच्या प्रतिष्ठेची व चुरशीची होणार आहे.फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी तहसील कार्यालय परिसराला अक्षरश: जत्रेचे स्वरूप आले होते. विविध पक्ष व त्यांच्या काही इच्छुक उमेदवारांनी मोठे शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्याच्या अखरेच्या दिवशी मोठ्या संख्येने अर्ज येण्याची शक्यता गृहीत धरून शासकीय यंत्रणेने योग्य नियोजन व जादा कर्मचारी नेमल्याने कोणताही गोंधळ न उडता शांततेत सर्वांना अर्ज भरता आले.तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसने सोमवारी अखेरच्या क्षणी आपापल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना तरडगाव जिल्हा परिषद गटातून शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर यांना साखरवाडी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. यावेळेस दोघांनी एकमेकांच्या मतदार संघाची आरक्षणामुळे अदलाबदल केली आहे.जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर यांच्या पत्नी भावना माणिकराव सोनवलकर यांना कोळकी जिल्हा परिषद गटातून विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सारिका अनपट यांचे पती दत्तात्रय अनपट यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या उषादेवी गावडे यांना गुणवरे जिल्हा परिषद गटातून पंचायत समितीच्या माजी उपसभापती कांचनमाला निंबाळकर यांनी विडणी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने विद्यमान कोणत्याही पंचायत समिती सदस्याला पुन्हा पंचायत समितीसाठी संधी दिलेली नाही. फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांचे सुपुत्र विश्वजीतराजे नाईक-निंबाळकर यांना राजकारणात उतरवित त्यांना वाठार निंबाळकर गणातून उमेदवारी दिली आहे.राष्ट्रीय काँग्रेसने जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी पूर्णपणे नवीन चेहरे दिले असून, विद्यमान पंचायत समिती सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गटातून तर सदस्य धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून उमेदवारी दिली आहे. गिरवी पंचायत समिती गणातून स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना काँग्रेसने उमेदवारी देत राजकारणात उतरविले आहे.भाजपानेही नवीन चेहरे दिले असून, माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे सुपुत्र सह्याद्री कदम यांना गिरवी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत राजकारणात उतरविले आहे. सह्याद्री कदम यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने जिल्हा परिषदेसाठी ४ तर पंचायत समितीसाठी ८ उमेदवार रिंगणात उतरविले असून, घटक पक्षातील रासप व शिवसेनेसाठी इतर जागा सोडल्याचे सह्याद्री कदम यांनी स्पष्ट केले आहे. शिवसेना व रासपनेही काही जागी उमेदवार उभे केले आहेत. अपक्षांनीही मोठ्या प्रमाणात अर्ज भरले असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील बऱ्याच इच्छुकांचा समावेश आहे. दाखल अर्जाची दि. ७ रोजी छाननी होणार आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रीय काँग्रेसनेही नव्या नेतृत्वाला उतरविलेराष्ट्रीय काँग्रेसनेही पूर्णपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन चेहरे दिले असून, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गट तर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून तर स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना गिरवी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे. अर्ज भरताना यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) आदी उपस्थित होते. राष्ट्रीय काँग्रेसनेही नव्या नेतृत्वाला उतरविलेराष्ट्रीय काँग्रेसनेही पूर्णपणे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नवीन चेहरे दिले असून, कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांना गिरवी जिल्हा परिषद गट तर ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील यांना हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून तर स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या पत्नी जयश्री आगवणे यांना गिरवी पंचायत समिती गणातून उमेदवारी दिली आहे. अर्ज भरताना यावेळी प्रल्हादराव साळुंखे-पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, नगरसेवक समशेरसिंह नाईक-निंबाळकर, दिगंबर आगवणे, महेंद्र सूर्यवंशी (बेडके) आदी उपस्थित होते.
फलटणला पाच निंबाळकर रिंगणात
By admin | Published: February 06, 2017 11:21 PM