आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २0 : होमिओपॅथसाठी सुरु असलेला माडर्न फारमॅकॉलॉजी अभ्यासक्रमाची राज्यातील वैद्यकिय महाविद्यालयातील प्रवेश क्षमता वाढविणेसाठी सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिले. होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज एक्स स्टुडंटस असोसिएशन (होमेसा) यांच्या शिष्टमंडळास आश्वाशित केले. होमिओपॅथसाठी मॉडर्न फारमॅकोलॉजी अभ्यासक्रम महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकमार्फत राज्यात सुरु झालेला आहे. पण राज्यातील होमिओपॅथीला प्रवेश घेणाऱ्यांची संख्या सुमारे ६०,००० असल्यामुळे सर्वांना प्रवेश मिळण्यास भरपूर कालावधी लागणार आहे, म्हणून राज्यामधील सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांची प्रथम वर्ष एम. बी. बी. एसची जी प्रवेशक्षमता आहे, त्या संख्येप्रमाणे मॉडर्न फारमॅकोलॉजी अभ्यासक्रमाची क्षमता करावी, अशी मागणी होमसतर्फे यावेळी करण्यात आली. यावेळी प्रवेशक्षमता वाढीसाठी वैद्यकिय शिक्षण मंत्रालयाची परवानगी लागणार असून त्यासाठी तातडीने प्रयत्न केली जातील असे आश्वासन कुलगुरु म्हैसेकर यांनी दिली.
या शिष्टमंडळामध्ये प्रेसिडेंट डॉ. राजकुमार पाटील, सचिव डॉ. राजेश कागले, डॉ. संतोष रानडे, डॉ. हिम्मतसिंह पाटील, डॉ. सुहास पाटील, डॉ. मिलींद गायकवाड, डॉ. फरजाना मुकादम, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. सचिन कुलकर्णी, डॉ. दिपाली पाटील, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. गीतांजली कोरे, डॉ. सचिन मगदूम, डॉ. रुपाली पाटील आदी उपस्थित होते.