कोल्हापूर शहरातील बहुतांश महाविद्यालयांमध्ये अकरावी, बारावी आणि पदवी अभ्यासक्रमांचे ऑफलाईन वर्ग सुरू झाले आहेत. कोरोनामुळे यंदा चार महिन्यांनी उशिरा वर्ग भरले. त्यामुळे नव्या-जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या आहेत. वर्ग सुरू झाल्याने कॉलेज कॅम्पस विद्यार्थ्यांच्या गर्दीने सध्या बहरला आहे.
फोटो (१५१२२०२०-कोल-कॉलेज कॅम्पस ०१,०२ व ०३) : कोल्हापुरात मंगळवारी डीआरके कॉमर्स कॉलेजच्या परिसरात विद्यार्थिनींच्या गप्पा रंगल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५१२२०२०-कोल-कॉलेज कॅम्पस ०४ ) : अकरावी, बारावीसह पदवी अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू झाल्याने कोल्हापूर शहरातील महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. डीआरके कॉमर्स कॉलेजबाहेर मंगळवारी एका विद्यार्थ्याने आपल्या मित्रांसमवेत सेल्फी टिपून घेतला. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५१२२०२०-कोल-कॉलेज कॅम्पस ०५) : विविध अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू झाल्याने महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली आहे. कोल्हापुरात मंगळवारी विवेकानंद कॉलेजमध्ये तास सुरू होण्यापूर्वी कट्ट्यावर विद्यार्थ्यांच्या गप्पा रंगल्या. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (१५१२२०२०-कोल-कॉलेज कॅम्पस ०६) : कोल्हापुरात मंगळवारी विवेकानंद कॉलेज परिसरातील बसस्टॉपवर विद्यार्थिनींच्या गप्पा रंगल्या होत्या. (छाया : नसीर अत्तार)