कागल
: येथील सर पिराजीराव प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीची ८५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाइन पद्धतीने संपन्न झाली. या सभेत सभासद कर्ज मर्यादा २५ लाखांवरून ३१ लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अध्यक्ष आवेलीन देसा होते. सभासदांना १६% लांभाश वाटप, कर्जाचा व्याजदर दहा टक्केवरून साडेनऊ टक्के करण्यात आला. तसेच जेष्ठ सेवानिवृत्त सभासदांच्या मागणीवरून ठेवीवर मासिक व्याज आकारणीची योजना जाहीर करण्यात आली.
संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑनलाइन पद्धतीने वार्षिक सभा झाली. त्यामध्ये तीनशेहून अधिक सभासदांनी भाग घेतला. स्वागत सुरेश सोनगेकर यांनी तर प्रास्ताविक रमेश जाधव यांनी केले. त्यांनी वर्षभरातील संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक संताजी पाटील यांनी केले. या सभेचे दीपप्रज्वालन आणि सरस्वती फोटो पूजन उपाध्यक्ष शीलाताई जाधव, संचालक टी.एस. गडकरी, रामचंद्र कोंडेकर, आनंदा गायकवाड, आनंदा पाटील, तुकाराम मोहिते, सुनील कदम, शिवाजी तिप्पे, रवींद्र भोई, दर्शना नलवडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. आभार सदानंद पाटील यांनी मानले.