शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

जिल्ह्यात पीरपंजांचे विसर्जन

By admin | Published: November 05, 2014 12:13 AM

अबिराची उधळण : हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा मोहरम

कोल्हापूर : इमामे हसन व हुसैन यांची स्मृती जागविणारा आणि हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा मोहरम जिल्ह्यात अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. आज, मंगळवारी ढोल-ताशांच्या निनादात, अबिराची उधळण करीत गावागावांतील पीर पंजांचे विसर्जन करण्यात आले. गडहिंग्लज : शहर व तालुक्यात मकानदारवाडा, खलिफ मोहल्ला, चावडी व मुल्ला मस्जिद याठिकाणी नालसाब व पंजे बसविण्यात आले होते. काल, सोमवारी खतलरात्री खाई फोडण्याचा विधी पार पडला. रात्री उशिरापर्यंत नालसाब खेळणे व पंजे भेटीचा कार्यक्रम झाला. आज, मंगळवारी सकाळी येथील नेहरू चौकात ताबूत भेटीचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रीय ऐक्य, सद्भावना, शांती व समृद्धीसाठी सामुदायिक प्रार्थना करण्यात आली.दुपारी अबिराची उधळण व ढोल-ताशांच्या गजरात आकर्षक सजविलेल्या ताबुतांची मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी उशिरा हिरण्यकेशी नदीघाटावर ताबुतांचे विसर्जन करण्यात आले.कुरुंदवाड : ढोल-ताशांच्या निनादात, अबिराची उधळण करीत कुरुंदवाडसह परिसरातील पीर पंजांचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. यामुळे शहरातील सर्वच गल्ली, रस्ते अबिरमय झाले आहेत.कुरुंदवाडसह परिसरात गेले दहा दिवस मोहरम सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वच मशिदी विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाल्या होत्या. प्रतिष्ठापनेपासून सर्व पीर पंजांची विधिवत पूजाअर्चा व विविध कार्यक्रमांनी मोहरम साजरा करण्यात आला. आज, मंगळवारी सकाळी नऊ वाजल्यापासून शहरातील सर्व पीरपंजे प्रत्येक घरोघरी पायावर पाणी घेत, ढोल-ताशांच्या निनादात अबिराची उधळण करीत शहरातील प्रमुख मार्गांवरून विसर्जन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.(प्रतिनिधी)