शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मविआ'ने महिलांसाठी जाहीर केलेले ३००० रुपये देता येतील का?; अजित पवारांनी राज्याचं आर्थिक गणितच सांगितलं
2
...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा
3
रोहित शर्माच्या टीम इंडियाला 'नकार'; पण भारताची 'ही' क्रिकेट टीम मात्र पाकिस्तानात जाणार!
4
चोरांनी मारला ५० तोळे सोन्यावर डल्ला, महिलेने दाखवली जादूटोण्याची भीती, त्यानंतर...
5
Mahayuti vs MVA: देवेंद्र फडणवीसांचं 'होम पीच' असलेल्या नागपुरातील 6 मतदारसंघात गणित कसं?
6
Gold Silver Price Today : सोन्याच्या दरात १५००, तर चांदीच्या दरात २५०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; खरेदीपूर्वी पटापट चेक करा भाव
7
प्रादेशिक पक्षांना मत म्हणजे भाजपाला मत; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचं मुस्लीमांना आवाहन
8
राज ठाकरेंची मोरारजी देसाईंसोबत तुलना, उद्धव ठाकरेंवर बोलताना..; संजय राऊतांची जहरी टीका
9
देवळालीत शिंदेसेना मैत्रीपूर्ण लढत देणार; हेमंत गोडसे यांची माहिती
10
नवाब मलिक पुन्हा तुरूंगात जाणार? EDची कोर्टात याचिका, वैद्यकीय जामिनाचा गैरवापर केल्याचा दावा
11
१६ वर्षांची असताना ट्रेनमध्ये ओढवला अतिप्रसंग, अभिनेत्रीने घडवली अद्दल, म्हणाली- "मी त्याच्या कानफटात लगावली अन्..."
12
"रवी राणा हे विनाशकाले विपरीत बुद्धी, त्यांच्याबद्दल…", अजित पवारांनी फटकारले
13
"उद्योग गुजरातला; तेथून ड्रग्ज मात्र महाराष्ट्रात"; काँग्रेसच्या नासिर हुसेन यांचा गंभीर आरोप
14
घटस्फोटानंतरही किरण रावसोबत काम करण्यावर आमिर खानने सोडलं मौन, म्हणाला- "त्याचा..."
15
Nagpur : काँग्रेसचा उमेदवार पोहोचला भाजपच्या प्रचार कार्यालयात, बघा काय घडलं?
16
काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी नावं येऊ लागली पुढे; भाषणांमधून नेत्यांचे संकेत, महिला नेत्याचीही चर्चा
17
Exclusive: १५२ नव्हे, १७१ जागांवर लढताहेत भाजपाचे उमेदवार! अशी केलीय खेळी
18
हर पल यहा जी भर जियो...! 'कल हो ना हो' पुन्हा रिलीज होणार, 'या' तारखेला येतोय भेटीला
19
Elcid Investments Share : २ दिवसांत ३४००० रूपयांनी घसरला ‘हा’ शेअर, नुकताच पोहोचला होता ३ लाखांपार
20
धक्कादायक! रील बनवण्याच्या नादात रेल्वे रुळावर स्टंट; पाठीमागून आली ट्रेन अन्...

कोल्हापूर शहर प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन सुशोभीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 4:27 AM

कोल्हापूर : शहराच्या प्रवेशद्वारची कमान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन तातडीने त्याचे सुशोभीकरण व नामकरण करावे, ...

कोल्हापूर : शहराच्या प्रवेशद्वारची कमान ही कोल्हापूरची अस्मिता आहे. प्रवेशद्वाराची जागा ताब्यात घेऊन तातडीने त्याचे सुशोभीकरण व नामकरण करावे, अशा सूचना सोमवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास लेखी पत्राद्वारे केल्या.

शहराचे प्रवेशद्वार गेली कित्येक वर्षे समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. शिवसेनेने प्रवेशद्वारावर रयतेचे राजे “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” यांच्या नावाचा फलक फडकविला होता. प्रवेशद्वाराचे विद्रुपीकरण करू नये, अशा सूचनाही कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासनास दिल्या होत्या.

प्रवेशद्वारात रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झुडपे, गवत, रस्त्याला पडलेल्या भेगा, सिमेंट रस्ता खुदाई करून तेथे केलेल्या डांबरीकरणामुळे पडलेले खड्डे, अतिक्रमण, महामार्गामुळे होणारी वाहतुकीची कोंडी, प्रवेशद्वार परिसरात न होणारी स्वच्छता आदी बाबी नित्याच्याच बनल्या. प्रवेशद्वार (तावडे हॉटेल कमान)ची जागा तत्काळ महानगरपालिकेच्या ताब्यात घेऊन प्रवेशद्वाराचे सुशोभीकरण करून यास “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” असे नामकरण करावे, करवीरनगरीमध्ये सहर्ष स्वागत अशा आशयाचा फलक लावावा, अशा सूचना क्षीरसागर यांनी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.