जयसिंगपूर : शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व पुतळ्यासाठीची नियोजित जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. दरम्यान, या निर्णयाचे शिवप्रेमींनी फटाके वाजवून स्वागत केले.छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि महाराजांच्या दैदिप्यमान इतिहासाला साजेसे असे म्युझियम उभारण्यासाठी जयसिंगपूर नगरपालिकेने शासनाकडे जागा ताब्यात मिळावी, अशी मागणी केली होती.
जयसिंगपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम व पुतळ्यासाठीची नियोजित जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली.
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे जागा ताब्यात घेण्याबाबत पालिकेने सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर यांनी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या माध्यमातून जागा ताब्यात मिळण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते.
विविध सामाजिक संघटना,पक्ष,व शिवप्रेमींकडून यासाठी पाठपुरावा सुरु होता. अखेर मुंबई झालेल्या बैठकीत ही जागा विनामोबदला नगरपालिकेकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाल्यामुळे पालिकेचे तीन कोटी रुपये वाचले आहेत. दरम्यान, या निर्णयाचे शिवप्रेमींनी फटाके वाजवून स्वागत केले.