न वाचता असाईन करावी
लोकमत न्यूज नेटवर्क,
गारगोटी : येथील श्री मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयात प्लेसमेंट सेल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्यातर्फे मॅनकाइंड फार्मा, दिल्ली या कंपनीकरिता प्रादेशिक पशुवैद्यकीय अधिकारी या पदासाठी कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते.
मुलाखतीच्या उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, मॅनकाइंड फार्मा कंपनीचे जिल्हा अधिकारी विनायक मुडेकर, पटेल साहेब, प्रादेशिक अधिकारी सूरज गार्डी, प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. पी. आर. खराडे हे उपस्थित होते. सांघिक चर्चेमध्ये वेगवेगळ्या विषयावरच्या संभाषणानंतर २५ विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष मुलाखतीसाठी निवड करण्यात आली. प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, विषयज्ञान, संभाषण कौशल्य, मार्केटिंग दृष्टिकोन इत्यादी बाबींची पडताळणी करून शेवटी सहा विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड करण्यात आली. सदर सहा विद्यार्थ्यांनी कंपनीच्या कामाचे ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर कामावर रुजू करून घेतले जाईल, अशी माहिती विनायक मुडेकर यांनी प्लेसमेंट सेल प्रमुख प्रा. प्रवीण खराडे यांना दिली. मुलाखतीसाठी २०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यामधील प्रत्यक्ष ७० विद्यार्थी हजर होते. मुलाखतीची सर्व प्रक्रिया कोविड चे सगळे नियम पाळून पार पाडण्यात आली. कॅम्पस मुलाखतीच्या यशस्वी आयोजनामध्ये प्लेसमेंट सेलच्या डॉ. सागर पोवार, डॉ. सुरेश राजरत्न, डॉ. सतीश पाटील, प्रा. श्रीकांत देसाई व प्रा. राजेंद्र बुडके आदींनी आपले योगदान दिले तसेच प्रबंधक मोहन पोवार व अधीक्षक अरविंद देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो ओळ - पी. बी. पाटील बोलताना. सोबत डॉ. सागर पोवार, अरविंद देसाई, मोहन पोवार, सुरेश राजरत्न आदी.