शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
2
राज ठाकरेंच्या बनावट सहीचा वापर, मनसेकडून शिवसेनेविरोधात तक्रार; वरळीत काय घडलं?
3
संजय शिरसाट यांच्या लेकाच्या वाहनावर हल्ला; उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारावर आरोप
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?
5
कैलास-मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार? भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांत झाली चर्चा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
7
बारामतीत हाय व्होल्टेज सामना: अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क, मताधिक्याविषयी म्हणाले...
8
गडचांदुरात भाजप उमेदवार देवराव भोंगळे यांच्याकडून ६१ लाखांची रक्कम जप्त
9
मुंबईत घरभाड्याचे दर देशात सर्वाधिक; दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर, ठाण्यात किती भाडेवाढ?
10
Maharashtra Election 2024: मराठी कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही व्होट केलं का?
11
२ दिवसांत ३५% नी आपटला Mamaearthचा शेअर; गुंतवणूकदारांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, कारण काय?
12
लेकीनंतर शाहरुख खानचा मुलगा आर्यन करतोय बॉलिवूड डेब्यू, पहिल्या वेबसीरिजची घोषणा
13
बाबा सिद्दीकी हत्या: शिवकुमार गौतमच्या पोलीस कोठडीत वाढ
14
संयुक्त जाहीरनाम्यात भर, उपासमारीविरुद्ध लढण्यासाठी जागतिक कराराचा प्रस्ताव; ‘जी-२०’चे युद्धसमाप्तीसाठी आवाहन
15
Vishal Mega Mart IPO: केवळ शॉपिंग नाही, आता कमाई पण करून देणार 'ही' कंपनी; येणार ₹८००० कोटींचा बहुप्रतीक्षीत IPO
16
A.R.Rahman divorce: "आम्हाला वाटलं होतं ३० वर्ष पूर्ण करू, पण...", ए. आर. रहमानचा २९ वर्षांचा संसार मोडला
17
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
18
पराभव दिसू लागल्यानेच मविआकडून तावडेंवर हल्ला; देवेंद्र फडणवीसांचा आरोप
19
जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार पादेश्वर महाराजांच्या गाडीवर दगडफेक; महाराज जखमी
20
सोलापुरात मतदान केंद्रात प्रथमोपचार किट; रुग्णवाहिका अन् डॉक्टरही तैनात

माता मृत्यू, बाल मृत्यचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:28 PM

कोल्हापूर शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर्व गर्भवती महिलांची नोंदणी पहिल्या तिमाहीमध्येच करा, असेही आदेश त्यांनी दिले.

ठळक मुद्देमाता मृत्यू, बाल मृत्यचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाय योजना करालसीकरणापासून एकही बालक वंचित ठेवू नका : मल्लिनाथ कलशेट्टी

कोल्हापूर : शहरात होणाऱ्या माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तात्काळ आवश्यक उपाययोजना राबवा, अशा सक्त सूचना आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दिल्या. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नियामक समितीच्या बैठकी प्रसंगी ते बोलत होते. शहरातील सर्व गर्भवती महिलांची नोंदणी पहिल्या तिमाहीमध्येच करा, असेही आदेश त्यांनी दिले.आयुक्त डॉ. कलशेट्टी म्हणाले, शुन्य ते १६ वर्ष वयोगटातील मुलांच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत खबरदारी घेणे आवश्यक आहे. शहरातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहता कामा नये. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त बाहय सत्रे आयोजित करावी. विशेषत: झोपडपट्टी भागामध्ये लसीकरण सत्रांचे बळकटीकरण करावे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या सर्वेक्षणा दरम्यान डेंग्यू, चिकुनगुनिया आदी किटकजन्य आजाराबाबतही माहिती संकलित करावी. तसेच नागरिकांमध्ये आजाराविषयी जनजागृती करण्याची सूचनाही आयुक्तांनी केली.

यावेळी उपायुक्त निखील मोरे, आरोग्याधिकारी डॉ.दिलीप पाटील, कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.आबासो शिर्के, सीपीआर वैद्यकीय अधिक्षक डॉ.तेजस्वीनी सांगरुळकर, स्त्रीरोग तज्ञ संघटना अध्यक्ष डॉ.मंजुळा पिशवीकर, बालरोग संघटना अध्यक्ष डॉ.व्यंकटेश तरकसबंद, रोटरी स्वयंसेवी संघटनेचे डॉ. प्रकाश संघवी, एड्स नियंत्रण कार्यक्रम व्यवस्थापक दिपा शिपुरकर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूरcommissionerआयुक्तwomen and child developmentमहिला आणि बालविकास