कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांनी वाढती संख्या, रुग्णालयांची ऑक्सिजनची मागणी व ऑक्सिजनचा पुरवठा या बाबी विचारात घेऊन कोरोना रुग्णांना आवश्यक असणारा ऑक्सिजन वेळेत उपलब्ध व्हावा, अशा पद्धतीने नियोजन करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
यावेळी मंत्री पाटील यांनी, जिल्ह्यासाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्याबाबत केंद्रस्तरावर पत्रव्यवहार करा. कोल्हापूर जिल्ह्यातील ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांशी समन्वय साधून मागणी तसा पुरवठा होईल यासाठीचे सूक्ष्म नियोजन करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
--
फोटो नं २३०४२०२१-कोल-ऑक्सीजन आढावा
ओळ :
कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
--