कोल्हापूर : येथील कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे, यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. त्यासाठी लसीचा पुरवठा आणि खासगी डॉक्टरांची मदत घेण्याचे योग्य नियोजन केले जात आहे. आशा वर्कर्सचे थकीत मानधन देणे, रेमडेसिविर इंजेक्शनची उपलब्धता, आरोग्य साधनसामग्री उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित अधिकारी आणि विभागाशी बोलून तात्काळ सोडवण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी रविवारी दिली.
‘कोल्हापूर दक्षिण’मधील लसीकरणाच्या आढाव्याबाबत आयोजित ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार शितल मुळे, बीडीओ जयवंत उगले यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
गावांमध्ये कोविड सेंटर उभारावे, लसीकरण केंद्रांसाठी अतिरिक्त वैद्यकीय कर्मचारी द्यावेत. सर्व्हे करणाऱ्या आशा वर्कर्स यांना त्यांचे थकीत मानधन द्यावे, आदी अन्य अडचणी सरपंच, ग्रामसेवक, इतर सदस्यांनी मांडल्या. त्यावर आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांवरील गर्दी टाळण्यासाठी योग्य नियोजनावर भर द्यावा, लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी, ज्या- त्या गावातील अडचणींची दखल घेऊन अधिकाऱ्यांनी त्या तात्काळ सोडवाव्यात, अशा सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी केल्या. मदत करणाऱ्या खासगी तत्त्वावरील आरोग्य कर्मचाऱ्यांना आपण स्वतः मानधन देऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आमदार पाटील यांनी केलेल्या सूचना...
१) कोरोना रुग्णांची संख्या कमी असलेल्या गावात एकदिवसीय कॅम्प आयोजित करून लसीकरण पूर्ण करावे.
२) लसीकरणाला अडचणी येणाऱ्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्या सोडवाव्यात.
३) रस्त्यावरील गर्दी टाळण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेऊन नागरिकांचे प्रबोधन करावे.
फोटो (२५०४२०२१-कोल-आमदार ऋतुराज पाटील) : कोल्हापुरात रविवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांतील लसीकरणाचा ऑनलाईन आढावा घेतला.
===Photopath===
250421\25kol_16_25042021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०४२०२१-कोल-आमदार ऋतुराज पाटील) : कोल्हापुरात रविवारी आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघांतील लसीकरणाचा ऑनलाईन आढावा.