शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
4
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
5
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
6
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
7
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
8
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
9
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
10
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
11
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
12
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
13
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
14
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा
15
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
16
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
17
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
18
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
19
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
20
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!

धान्यबाजारात व्यापारी संकुलाचे नियोजन - कोल्हापूर महापालिकेकडे आराखडे तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2019 1:10 AM

भारत चव्हाण । कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले ...

ठळक मुद्देपार्किंगचा प्रश्न सुटणार; खर्चाचे अंदाजपत्रक नव्याने होणार

भारत चव्हाण ।कोल्हापूर : लक्ष्मीपुरीतील धान्यबाजारात मोठे व्यापारी संकुल उभारण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा विचार असून, त्यासंबंधीचे आराखडेही तयार केले गेले आहेत. धान्यबाजार मार्केट यार्डात स्थलांतरित झाल्यानंतर आराखड्याची फाईल पुन्हा चर्चेत आली आहे. या नियोजित व्यापारी संकुलामुळे लक्ष्मीपुरीसारख्या गजबजलेल्या परिसराला एक चांगली शिस्त लागण्यास मदत होणार असून, पार्किंगचा प्रश्नही कायमचा सुटणार आहे.

लक्ष्मीपुरीतील जयधवल बिल्डिंग ते चांदणी चौक, फोर्ड कॉर्नर ते श्रमिक हॉल आणि राज हॉटेल ते जयधवल बिल्डिंग चौकदरम्यानच्या बाजारपेठेतील हातगाड्यांचे जाळे, विक्रेत्यांनी मांडलेला बाजार, अनियंत्रित वाहतूक, दुकानदारांचे अतिक्रमण, स्कॅ्र प मार्केट, वाहनदुरुस्ती करणारे गॅरेजवाले यांच्यामुळे शहराच्या मध्यवस्तीतील हा परिसर अक्षरश: बेशिस्तीचा आणि प्रचंड गर्दीचा झाला आहे. त्यावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. या परिसरात महापालिकेच्या मालकीची सुमारे २० हजार चौरस फूट इतकी जागा असून त्यावर सुमारे ४० वर्षांपासून ५४ दुकानगाळे आहेत.

धान्यबाजारामुळे दिवसभर मोठ्या अवजड ट्रकची ये-जा सुरू असल्यामुळे केवळ या परिसरातच वाहतुकीची कोंडी होत नव्हती; तर संपूर्ण शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला होता. त्यामुळे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी मनावर घेऊन शहरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी केली. त्यामुळे परिसरातील वाहतुकीला काही प्रमाणात शिस्त लागली. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. आता महापालिका प्रशासनाने त्याहीपुढे जाऊन व्यापारी संकुल उभारले तर येथील दुकानदारांना शिस्त लागेल आणि पार्किंगचा मोठा प्रश्नही कायमचा सुटण्यास मदत होणार आहे.

महापालिका प्रशासनाने २०१३-१४ या आर्थिक वर्षात नगरसेविका ज्योत्स्ना बाळासाहेब मेढे यांच्या पुढाकारातून धान्यबाजारातील महापालिकेच्या मालकीच्या २० हजार चौरस फूट जागेवर व्यापारी संकुल उभारण्याकरिता आराखडे तयार केले आहेत. तेथील दुकानदारांना भाडेतत्त्वावर गाळे देण्याचा करारही संपला असल्याने त्याचा आधार घेऊन हे आराखडे, अंदाजपत्रक तयार केले; परंतु त्यातील काही व्यापारी प्रशासनाने दिलेल्या नोटिसीचा आधार घेऊन न्यायालयात गेले आणि स्थगिती मिळविली. त्यामुळे या प्रयत्नाला खीळ बसली.

चार वर्षांनंतर मात्र नियोजित व्यापारी संकुल पुन्हा चर्चेत आले आहे. धान्य दुकानदारांबरोबर केलेल्या कराराची मुदत संपली असल्याने गाळे ताब्यात घेऊन त्या ठिकाणच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याच्या मागणीला आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना गती आली आहे.चार वर्षांत बांधकाम खर्च वाढला असल्याने २०१४ मध्ये केलेल्या आराखड्याची मात्र किंमत वाढणार आहे. त्यामुळे खर्चाचे एस्टिमेट नव्याने तयार करावे लागणार असल्याचे सांगण्यात आले.दोन गाळे विकले कोणी?धान्यबाजारातील महापालिकेच्या मालकीच्या जागेतील ५४ दुकानगाळ्यांपैकी दोन दुकानगाळे परस्पर मालकी हक्काने विकले गेल्याची माहिती समोर आली आहे. हा व्यवहार अधिकारी पातळीवर रीतसर करून दिला आहे; परंतु या व्यवहारास महासभेची, स्थायी समितीची अथवा आयुक्तांची मान्यता घेण्यात आलेली नाही. त्यामुळे हे दोन गाळे विकले कोणी आणि कोणाच्या अधिकारात विकले, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.जर बेकायदेशीरपणे कोणी गाळे विकले असतील तर तो फौजदारी स्वरूपाचा गुन्हा होऊ शकतो. या प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांचा छडा लावण्याची आवश्यकता आहे.व्यापारी संकुलात जाणीवपूर्वक महापालिकेतील काही अधिकाऱ्यांनी खोडे घातल्याची चर्चाही महापालिकेत आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी या प्रकरणात लक्ष घालणे अपेक्षित आहे.व्यापारी संकुलाचा आराखडाजागेचे एकूण क्षेत्रफळ - १९ हजार ९३० चौरस फूट.चटई क्षेत्र - मध्यवस्तीतील जागा असल्याने चटई क्षेत्र २.६२ हजार चौरस फुटांच्या बांधकामाचा आराखडा तयार.२०१४ च्या ‘डीएसआर’प्रमाणे व्यापारी संकुलाची किंमत १४ कोटी. 

लक्ष्मीपुरीत जर व्यापारी संकुल उभारले गेले तर अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटणार आहेत. दुकानदार, विक्रेते, हातगाडीवाले यांना शिस्त लागणार आहे. सध्याचे ओंगळवाणे चित्र बदलणार आहे. महापालिका प्रशासनाचे वार्षिक उत्पन्नही वाढणार आहे. महापालिका प्रशासनाने स्वत: व्यापारी संकुल विकसित करावे, अशी आपली मागणी आहे.- निलोफर आजरेकर, नगरसेविका, महापालिका

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका