कोल्हापूर : येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बागल चौक कबरस्थान येथे सोमवारी कोल्हापूर बागवान समाज यांच्यावतीने विविध प्रकारचे कमी मूळ येणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षारोपणास आजरेकर फौंडेशन यांच्याकडून वृक्ष देण्यात आले.
वृक्षलागवड मुस्लिम बोर्डिंगचे प्रशासक कादरभाई मलबारी, बागवान समाजाचे अध्यक्ष आर. डी. बागवान कबरस्तान विकास समितीचे फारूक पटवेकर, मुजीब महात, अबीद मणेर, बागवान समाजाचे उपाध्यक्ष रियाज बागवान, कार्याध्यक्ष बकश बागवान, खजानिस हाजी कयूम बागवान यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी संपूर्ण जगावर आलेल्या कोरोना महामारीचे संकट लवकरात लवकर संपण्यासाठी सामूहिक दुवा करण्यात आली.
या कार्यक्रमाला बागवान समाजाचे संचालक आशपाक आजरेकर, हाजी आदम बागवान, आशपाक आजरेकर, जावेद बागवान, इम्तियाज बागवान, जमीर बागवान,अल्लाउद्दीन बागवान, राजू बागवान,वसीम बागवान, खुदबुद्दीन गोलंदाज,तौफिक शमशुद्दीन मुल्लाणी, सुरेश कुरणे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - १९०७२०२१-कोल-बागवान समाज
ओळ - कोल्हापुरातील बागवान समाजाच्यावतीने सोमवारी बागल चौक कबरस्थान येथे वृक्षांची लागवड करण्यात आली.