लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा): वृक्षतोडीमुळे देशी व औषधी वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत असल्याने पर्यावरणाचे नुकसान होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व वनऔषधी वृक्षाचे संवर्धन तसेच संरक्षण करण्यासाठी वाशी (ता. करवीर) येथील राजवीर पब्लिक स्कूल या शाळा सरसावली असून शाळा परिसरात नवीन वर्षाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व व आवश्यकता समजावून पर्यावरण संवर्धनास कार्यरत राहण्याबाबत शपथ देण्यात आली. शाळा परिसरात वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे माजी प्राचार्य जे. के. पवार सर, निवृत्त वन अधिकारी आनंदा पाटील, निवृत्त सैनिक बाळाराम कांबळे, मुख्याध्यापिका सौ. वैष्णवी सरनोबत, अध्यक्ष बी. ए. पाटील, समन्वयक श्री. बरगे सर, उपाध्यक्ष एम. एस. पाटील, संचालक केरबा शेळके, आदी उपस्थित होते.
फोटो ओळ
वाशी (ता. करवीर) येथील राजवीर पब्लिक स्कूल या शाळेच्यावतीने वनौषधी वृक्षाचे
संवर्धन करण्यासाठी शाळा परिसरात वृक्षारोपण करताना माजी प्राचार्य जे. के. पवार, बी. ए. पाटील, वैष्णवी सरनोबत व इतर