अभिनेते सयाजी शिंदे संंचालित सह्याद्री देेवराई संस्था, करनूर देवराईची निर्मिती करीत असलेेेली वनमित्र संस्था, कागल आणि मेहता परिवार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
स्वागत कार्याध्यक्ष काशीनाथ गारगोटे यांनी केले. प्रास्ताविकात अशोक शिरोळे यांनी वनमित्र संस्थेच्या कामाची माहिती दिली. ग्रंथप्रेमी अरुण नाईक यांनी हा उपक्रम घेण्यामागील भावना व्यक्त केली. पर्यावरणप्रेमी सुहास वायगंणकर यांनी देवराई आणि वृक्षसंगोपनाची माहिती दिली. सत्कारमूर्ती अनिल मेहता यांनी देवराई उभी करण्यासाठी करनूर ग्रामस्थांचे सहकार्य आणि वनमित्र संस्थेच्या कार्यकर्त्यांचे कष्ट बघून खूप समाधान वाटले. डाॅ. रवींद्र व्होरा, विजय इंगवले यांचीही भाषणे झाली. डाॅ. रवींद्र ठाकूर, सुनील मेहता, रूपा मेहता, अखिल मेहता, साहिल मेहता, सचिन घोरपडे, सूरज कांबळे, विनायक उपाध्ये, प्रवीण जाधव, दीपक माने, अक्षय भोसले, रोहित जाधव, अजित पाटील, यशोदीप चौगुले उपस्थित होते.
फोटो कॅप्शन
करनूर देवराईमध्ये वृक्षारोपण करून अनिल मेहता यांनी आपला ८० वा वाढदिवस साजरा केला. यावेळी मेहता कुटुंबीय आणि वनप्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.