गडहिंग्लज : लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायती व लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने बदाम, पिंपळ, वड, लिंब व जांभूळ आदी जातींच्या वृक्षांचा समावेश आहे.प्रांताधिकारी विजया पांगारकर व तहसिलदार दिनेश पारगे यांच्याहस्ते वृक्षलागवडीचा प्रारंभ झाला. अध्यक्षस्थानी सरपंच अॅड. परमेश्वरी पाटील होत्या.यावेळी उपसरपंच दीपक राजगोळे, ग्रा. पं. सदस्य संतोष पाटील, मनिषा ढेंगे, संजय कांबळे, उज्वला कुरळे, कमल कुडचे, ग्रामसेवक बाबासाहेब पाटील, तलाठी जितेंद्र माने, पोलिस पाटील मारूती संकपाळ, राजशेखर पाटील, रामदास शेटके, गजेंद्र कांबळे, महादेव येसरे, अक्षय कुडचे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
लिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 6:50 PM
wildlife gadhinglaj kolhapur : लिंगनूर काानूल (ता. गडहिंग्लज) येथे रस्त्याच्या दुतर्फा ग्रामपंचायती व लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने बदाम, पिंपळ, वड, लिंब व जांभूळ आदी जातींच्या वृक्षांचा समावेश आहे.
ठळक मुद्देलिंगनूरमध्ये लोकसहभागातून ४४८ देशी वृक्षांची लागवडबदाम, पिंपळ, वड, लिंब, जांभूळ आदी जातींच्या वृक्षांचा समावेश