शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

शाळेत खेळा आता  आट्यापाट्या, सेपक-टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेटॅथलॉन, सॉफ्ट टेनिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 11:08 AM

भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे;

ठळक मुद्देखेळ प्रकारांची संख्या ५१ वर पोहोचलीभारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली

सचिन भोसलेकोल्हापूर : भारतीय खेळ महासंघाने यंदाच्या वर्षात नवीन सहा खेळ प्रकारांना मान्यता दिली असून, त्यात पूर्वीचा आट्यापाट्या खेळासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन, सॉफ्ट टेनिस या खेळांचा समावेश शालेय क्रीडा प्रकारात झाला आहे; त्यामुळे शालेय क्रीडा प्रकारांची आता एकूण संख्या ५१ इतकी झाली आहे.

विविध खेळांत अनेक भारतीय खेळाडूंनी जगभरात देशाचा नावलौकिक करावा. त्यातून खेळ आणि आरोग्य उत्तम राहावे. देशाची पिढी सुदृढ व्हावी. याकरिता केंद्र शासनाच्या भारतीय खेळ महासंघाने देशी खेळांसह परदेशी खेळांचाही यंदापासूनच्या शैक्षणिक वर्षात केला आहे. यात विशेष म्हणजे आट्यापाट्या हा खेळ बहुतेक मुलांच्या विस्मरणात गेला होता. त्यास पुनरुज्जीवन मिळावे म्हणून भारतीय खेल महासंघाने त्याचा पुन्हा शालेय क्रीडा प्रकारात समावेश केला आहे.

यासह सेपक टाकरा, रब्बी, टेनीक्वाईट, मॉडर्न पेंटथलॉन या विदेशी खेळाचाही समावेश केला आहे. यासंबंधीचे प्रशिक्षण क्रीडा शिक्षकांना गेल्या महिनाभर राज्या-राज्यातील क्रीडा व युवक सेवा संचलनालये करीत आहेत. कोल्हापुरातही अशा प्रकारची कार्यशाळा नुकतीच जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आली. यात या खेळांचे आंतरराष्ट्रीय नियम, खेळाडूंची संख्या, मैदान, रिंग, आदींची तांत्रिक माहिती तज्ज्ञांकडून देण्यात आली.

या सहा खेळांमुळे आता शालेय क्रीडा प्रकारात एकूण ५१ खेळांचा समावेश झाला आहे. यापूर्वीच्या खेळांमध्ये मैदानी स्पर्धा, फुटबॉल, हँडबॉल, बॉक्सिंग, हॉकी, किक बॉक्सिंग, धनुर्विद्या, वेटलिफ्टिंग, वुशू, कुस्ती (फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन), मल्लखांब, बास्केटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, तायक्वाँदो, बॉल बॅडमिंटन, कॅरम, तायक्वाँदो, बॉल बॅडमिंटन, टेबल टेनिस, जिम्नॅस्टिक, खो-खो, कबड्डी, लॉन टेनिस, स्क्वॅश, शुटिंग बॉल, कराटे, बुद्धिबळ, योगा, ज्युदो, बेसबॉल, व्हॉलीबॉल, जलतरण, वॉटरपोलो, डायव्हिंग, सॉफ्टबॉल, थ्रोबॉल, सायकलिंग, रोलर स्केटिंग, रोलर हॉकी, रायफल शुटिंग, तलवारबाजी, रोलबॉल, सिकई मार्शल आर्ट, डॉजबॉल, आदी खेळांचा समावेश आहे. 

नव्या व जुन्या खेळांची सांगड घालून चांगली सुदृढ पिढी घडावी. त्यातून चांगले खेळाडू राष्ट्राला मिळावेत. या उद्देशाने भारतीय खेळ महासंघ व राज्य क्रीडा व युवा संचलनालयाने नव्या सहा खेळांचा यंदापासून समावेश केला आहे.- चंद्रशेखर साखरे, जिल्हा क्रीडाधिकारी, कोल्हापूर