राजाराम लोंढेकोल्हापूर: पंतप्रधान किसान पेन्शन योजनेतील लाभार्थ्यांचा बारावा हप्ता बँकेत जमा झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील २२ हजार ६०० बोगस खात्यांपैकी तब्बल १४ हजार ९०० खात्यांची पेन्शन या हप्त्यात बंद झाली आहे. ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यांच्याकडून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वसूल करा, जे पैसे भरणार नाहीत, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी महसूल यंत्रणेला दिले आहेत.देशातील शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला, देशातील लाखो शेतकरी पेन्शनचा लाभ घेतात. कोल्हापूर जिल्ह्यातील ५ लाख ३७ हजार २३ खातेदार पेन्शन घेत आहेत. पेन्शन योजनेच्या निकषात न बसणारे अनेक जण लाभ घेत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या. त्यानंतर संपूर्ण खात्यांची चौकशी केली असता, २२ हजार ६०० खाती अपात्र ठरविण्यात आली. यामध्ये सर्वाधिक ९,५०० खातेदारांच्या नावावर जमीनच नाही. या खातेदारांची पेन्शन बंद करण्याबरोबरच त्यांनी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले घेतलेल्या लाभाची रक्कम वसूल होते. त्यानुसार गेली वर्षभर महसूल यंत्रणा काम करीत आहे.बोगस खात्यांची नावे कळवूनही त्यांना येणारी पेन्शन बंद झाली नव्हती. त्यामुळे आयुक्तांनी महसूल यंत्रणेला धारेवर धरले होते. त्यामुळे बारावा हप्ता १५६६ लांबणीवर पडला होता. अखेर २२ हजार ६०० पैकी १४ हजार ९०० बोगस खात्यांची पेन्शन बाराव्या हप्त्यात बंद झाली आहे. तेराव्या हप्त्यात उर्वरित खातेदारांपैकी एकही येता कामा नये, अन्यथा संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल, असा इशारा सरकारने दिला आहे. ३१ डिसेंबर पैसे परत करण्याची शेवटची तारीख आहे.
महाराष्ट्र आघाडीवर'पीएम किसान'चे सर्वाधिक लाभार्थी महाराष्ट्र, बिहार व उत्तर प्रदेशमध्ये आहेत. त्याचबरोबर बोगस खात्यांची संख्याही याच राज्यात अधिक आहेत.
पती-पत्नीपैकी एकालाच पेन्शनएका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पेन्शनचा लाभ देणे बंधनकारक असताना पती, पत्नी दोघांनाही पेन्शन मिळत होती. अशी १५६६ खातेदार होते. या हप्त्यापासून एकालाच मिळणार आहे.
दृष्टिक्षेपात पीएम किसान लाभार्थी
- एकूण लाभार्थी - ५०,३७,२३
- अपात्र - ३८००
- विविध पेन्शनचा लाभ घेणारे - ३७५०
- जमीनच नसणारे - ९५००
- पती, पत्नी दोघांनाही लाभ - १५६६