कोल्हापूर : पंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध येऊन वर्ष झाले तरी केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील बँकेच्या कार्यालयासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केली. शासनाच्या विरोधात घोषणा देताना ठेवी परत करण्याची मागणीही करण्यात आली.गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पी.एम.सी. बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध आणले होते. या बँकेत जिल्ह्यातील ठेवीदारांचे ६०० कोटी रुपये अडकले आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाल्याने ठेवीदारांचाही जीव गेले वर्षभर टांगणीलाच लागलेला आहे. या संदर्भात बँक प्रशासनाकडे विचारणा केली तर त्यांच्याकडून दाद दिली जात नसल्याने चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली ह्यपी.एम.सी बँक बचाव कृती समितीह्ण स्थापन करण्यात आली. या समितीच्या व न्यायालयाच्या रेट्यामुळे काही पैसे काढता आले आहेत; पण अजूनही कोटींच्या पटीत रकमा अडकल्या आहेत.वर्षपूर्ती होत असताना कृती समितीने केंद्र सरकारने एक तर बँक पूर्ववत सुरू करावी अन्यथा दुसऱ्या सक्षम बँकेत ती विलीन करावी, या मागणीसाठी लढा तीव्र केला आहे. बुधवारी झालेली निदर्शने हा त्याचाच एक भाग आहे. येथून पुढे आणखी आवाज उठविण्याची गरज चंद्रकांत यादव यांनी व्यक्त केली. आंदोलनात प्रशांत डंगर, नरहर कुलकर्णी, महेद्र माने, लक्ष्मीकांत नलवडे यांच्यासह ठेवीदारांनी सहभाग घेतला.
पी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 6:53 PM
पंजाब महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेवर निर्बंध येऊन वर्ष झाले तरी केंद्र सरकार कोणतीच भूमिका घेत नाही. त्याचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली स्टेशन रोडवरील बँकेच्या कार्यालयासमोर बुधवारी जोरदार निदर्शने केली. शासनाच्या विरोधात घोषणा देताना ठेवी परत करण्याची मागणीही करण्यात आली.
ठळक मुद्देपी.एम.सी. बँकेसमोर कृती समितीची जोरदार निदर्शनेशासनाच्या विरोधात घोषणा, ठेवी परत करण्याची मागणी