शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

Kolhapur: पी.एन. पाटील यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव अजूनही कमी नाही, कार्यकर्त्यांकडून देवाला साकडे

By विश्वास पाटील | Published: May 21, 2024 1:16 PM

कोल्हापूर : काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट ...

कोल्हापूर : काँग्रेसचे जेष्ठ आमदार पी.एन.पाटील यांची प्रकृती अजूनही गंभीरच असल्याचे मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता डॉक्टरांनी केलेल्या पाहणीनंतर स्पष्ट झाले. त्यांच्या मेंदूतील रक्तस्त्राव थांबायला हवा होता परंतू तो अजून थांबत नसल्याने ही चिंतेची बाब असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ते यातून बरे व्हावेत यासाठी कार्यकर्ते देवाला साकडे घालत आहेत.मंगळवारी सकाळी मुंबईतील प्रख्यात मेंदूशल्य चिकित्सक डॉ.सुहास बराले, राहूल पाटील यांनी ॲस्टर आधार रुग्णालयात आमदार पाटील यांच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकांशी चर्चा केली. रविवारी सकाळी आमदार पाटील चक्कर येवून बाथरुममध्ये पडल्याने त्याचवेळी त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता. त्यांच्यावर रविवारी सायंकाळीच तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर डॉक्टरांनी ७२ तासांचा अवधी काळजी करण्यासारखा असल्याचे सांगितले होते. कालच्या प्रमाणे आजही त्यांची प्रकृती स्थिर आहे. रक्तस्त्राव थांबला असता तर ते उपचाराला चांगला प्रतिसाद देतात असे म्हणता आले असते. परंतू दुर्देवाने तसे झालेले नाही. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांचे पथक त्यांच्या उपचारांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी रिघ..रुग्णालयात येवून आमदार पाटील यांच्या प्रकृतीबध्दल जाणून घेण्यासाठी व त्याचवेळेला राहूल पाटील यांना धीर देण्यासाठी गेली तीन दिवस जिल्हाभरातील कार्यकर्त्यांची रिघ लागली आहे. सकाळी व्ही. बी. पाटील, भारत पाटील भुयेकर, डॉ. संदिप पाटील, उदयसिंह पाटील, भोगावतीचे कार्यकारी संचालक संजय पाटील यांच्यासह अनेकांनी येवून प्रकृतीची विचारपूस केली.

कार्यकर्त्यांच्या जीवाला घोर..रात्री नको म्हणतानाही पाचपंचवीस कार्यकर्ते दवाखान्याच्या आवारात झोपायला थांबत आहेत. साहेबांच्या काळजीने घरी जावून झोप लागत नाही म्हणून आम्ही इथेच थांबतो असे ते सांगतात त्यामुळे सगळ्यांचाच नाईलाज होत आहे.

दर्डा यांच्याकडून धीर..लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी राहूल पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधून आमदार पाटील यांच्या प्रकृतीची चौकशी केली व राहूल यांना आधार दिला. दर्डा व आमदार पाटील यांचे खूप चांगले ऋणानुबंध आहेत. त्या दोघांनी एकाचवेळी विधानसभेत काम केल्याने त्यांच्यात मित्रत्वाचे नाते आहे.

शाहू छत्रपती रोज रुग्णालयात..शाहू छत्रपती यांनीही सकाळी राहूल पाटील यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केली. त्यांचीही रोज रुग्णालयात न चुकता फेरी सुरु आहे. त्यांना आपण रुग्णालयात येवू नका, प्रकृतीचे अपडेट कळवतो म्हणून सांगितले तरी त्यांना वाड्यावर चैन पडत नसल्याने ते थोडावेळ का असेना रुग्णालयात येवून जात आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरP. N. Patilपी. एन. पाटील