कोल्हापूर : गडमुडशिंगी (ता. करवीर) प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यूमोकोकल लसीकरणास प्रारंभ झाला. नूमोनिया मेंदूज्वर व सेप्टी सेमिया हे गंभीर आजार असून, त्यापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी या लसीचा वापर केला जातो.
गडमुडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात करवीरचे माजी सभापती प्रदीप झांबरे यांच्या हस्ते व सरपंच अश्विनी शिरगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. यावेळी रुग्ण कल्याण समिती सदस्य संतोष कांबळे, अरुण शिरगावे, वैद्यकीय अधिकारी रिझवाना मुल्ला, आरोग्य सेवक संध्या महाजन, मेघा गायकवाड, गटप्रवर्तक आशा पाटील, विद्या जाधव, डी. जी. कोरे, वंदना गुरव आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : गडमुडशिंगी (ता. करवीर) प्राथमिक आरोग्य केंद्रात न्यूमोकोकल लसीकरणास प्रारंभ झाला. यावेळी प्रदीप झांबरे, अश्विनी शिरगावे आदी उपस्थित होते. (फोटो-१६०७२०२१-कोल-गडमुडशिंगी)