शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

कचरा उठावासाठी विष प्राशनाचा इशारा

By admin | Published: February 05, 2016 11:12 PM

उदगाव ग्रामसभा : वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढणार

जयसिंगपूर : ग्रामपंचायत जागेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीला वारंवार कळवूनही याबाबत कानाडोळा करीत आहे. त्वरित कचरा उठाव करा, अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा इशारा येथील एका महिलेने ग्रामसभेत दिल्याने एकच खळबळ उडाली. उदगाव (ता. शिरोळ) येथे २६ जानेवारीची तहकूब ग्रामसभा आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पाटील होत्या. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी १४ व्या वित्त आयोगातील ३२ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे असल्याने याच्या आराखड्याची माहिती देऊन मंजुरी घेण्यात आली. दरम्यान, सोनबा पाटील यांनी बिअरबारसाठी ग्रामपंचायतीत मंजुरी पत्र दाखल केले होते. मात्र, याला विरोधी गटातील महिला सदस्यांनी विरोध केला, तर सत्तारूढ सदस्य शिवाजी कोळी यांनी यास परवानगी द्या, अन्यथा गावातील सर्वच परवाने रद्द करा, अशी मागणी केली.स्वच्छतेवरून धोंडूबाई कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यासह प्रशासनाला धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला. प्रत्येक वेळी पाहणी करून जाता, स्वच्छता करण्याबाबत अंमलबजावणी होत नाही, असा सवाल उपस्थित करून स्वच्छता करा अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. यावर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तुमचा प्रश्न ताबडतोब निकालात काढण्याची ग्वाही दिली.यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती गठीत करण्यात आली, तर बसस्थानकावरील अतिक्रमण व अनधिकृत डिजिटल फलके काढण्याचा दुसऱ्यांदा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा ठराव करण्यात आला. यासह विषयपत्रिकेवरील ३२ विषयांपैकी २६ विषयांना ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच प्रकाश बंडगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष कोरे, प्रज्ञा मगदूम, सविता ठोमके, शिवाजी कोळी, राजाराम वरेकर, अभिनंदन पाटील, राजेंद्र मगदूम, भरत पाटील, शांताराम पाटील, दिलीप माने, शरद लुगडे, अमोल माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)