इचलकरंजी : शहर व परिसरात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. यामध्ये १६८ वाहनांसह ५४ विनामास्क आणि ४२ आस्थापनांवर केली. कारवाईत एक लाखांचा दंड वसूल केला.
वाढत्या कोरोनामुळे शहरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लागू केला होता. सोमवारी शिथिलता मिळाल्याने खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने पोलीस प्रशासनाकडून ही कारवाई केली.
शिवाजीनगर पोलिसांनी ४३ वाहने जप्त करून सात हजार २०० रुपये, विनामास्क फिरणाऱ्या ४३ जणांकडून दोन हजार ३५०, तसेच निर्बंध असतानाही ११ आस्थापना सुरू ठेवल्याबद्दल अकरा हजार रुपये, गावभाग पोलिसांनी २२ वाहनांवर कारवाई करत सात हजार ८०० रुपये, विनामास्क फिरणाऱ्या पाचजणांना दोन हजार ५००, तर २६ आस्थापनांकडून २६ हजार रुपये, तर ५ आस्थापनांना १५ हजार रुपये दंड ठोठावला. शहर वाहतूक नियंत्रण शाखेने १०३ वाहनांवर कारवाई करत २३ हजार ३०० रुपये दंड, तर ३७ वाहने जप्त करत विनामास्क फिरणाऱ्या सहाजणांकडून तीन हजारांचा दंड वसूल केला.