कोल्हापूर : पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या हाती दुचाकी देऊन अपघाताला निमंत्रण देणाऱ्या ४८ पालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करून २४ हजार रुपये दंड वसूल केला. शहरात वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिस प्रशासनाने कठोर पावले उचलत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईचे सत्र सुरू केले आहे. मोटार व्हेईकल अॅक्टनुसार परवाना नसणे, फिल्मिंग काचा, झेब्रा क्रॉसिंगवर, स्टॉप लाईनवर वाहन उभे करणे, डावी बाजू मोकळी न ठेवणे, सिग्नलच्या नियमांचे उल्लंघन करणे, एकेरी मार्गावर वाहन चालविणे, ट्रिपल सीट, फॅशनेबल नंबरप्लेट वाहनांवर लावून बिनदिक्कतपणे वावरणाऱ्या वाहनचालकांवर कठोर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांत शहरात धूम स्टाईलने अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना दिसत आहेत. त्यांना लक्ष्य करीत पोलिसांनी कारवाई केली. त्यामध्ये ४८ मुलांना वाहनांसह ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांकडून दंड वसूल केला. (प्रतिनिधी)
पोलिसांकडून पालकांवर कारवाई
By admin | Published: April 27, 2017 12:09 AM