शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

पोलिसांवरील हल्ला पडला महाग--माजी उपमहापौर यांच्यासह ४० जणांना लागणार मोका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 2:41 PM

शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत.

ठळक मुद्देपोलिस अधिक्षकांनी विशेष पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविला प्रस्ताव--अधिकाऱ्यावरील हल्ल्यानंतर पोलिसांना आली जाग...सायंकाळपर्यंत मंजूरी मिळण्याचा विश्वास -शमा मुल्लासह २० जणांना पोलीस कोठडी मटका बुकींगवाल्यांचा पोलिसांवरील हल्ला पडला महाग,  माजी उपमहापौर यांच्यासह ४० जणांना लागणार मोका  , खुनाचा प्रयत्न, दरोडा असे गंभीर गुन्हे दाखल

कोल्हापूर : शहरातील यादवनगर-पांजरपोळ येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्यासह पथकावर हल्ला करून सर्व्हिस पिस्तूल जबरदस्तीने काढून घेत रोखल्याने माजी उपमहापौर शमा मुल्लासह २० जणांना पोलिसांनी अटक केली. मात्र या प्रकरणात कायद्याने या सर्वांच्या आणखीनच चांगल्या मुसक्या आवळल्या आहेत.  आज सकाळी पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी विशेष पोलीस महासंचालक संदीप वारके यांच्याकडे तत्काळ या सर्वांना मोका लावण्यासाठी प्रस्ताव मंजूरीला पाठविला आहे. यावर सायंकाळी सकारात्मक निर्णय होईल असा विश्वास देशमुख यांनी पत्रकारांना दिला आहे. पोलीस महासंचालक यांनीही अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

 पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार बैठकीत सांगितले पोलीस अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आज आणखी चौघांना अटक करण्यात आली त्यात निलेश दिलीप काळे राजू येशील सुंदर रावसाहेब दाभाडे व जावेद मुल्ला यांचा समावेश आहे त्यामुळे अटक झालेल्यांची संख्या पंचवीस झाले आहे मुख्य संशयित निलेश काळे याने वरिष्ठ अधिकारी शर्मा यांचे सुरक्षा रक्षक निरंजन पाटील यांच्यावर हल्ला करून सर्विस रिवाल्वर पळवून नेले होते लक्षतीर्थ वसाहत जवळ चौघांना शेतात पाटलाकडून पकडले असेही पोलीस अधीक्षक डॉक्टर देशमुख यांनी सांगितले यावेळी यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत आदी उपस्थित होते

  या हल्ला प्रकरणातील सर्व संशयितांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मटकाचालक सलीम यासिन मुल्ला पिस्तूल घेऊन आपल्या साथीदारांसह पसार झाला होता. पोलिसांवर झालेल्या या हल्ल्याची पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दरोडा, शासकीय कामात अडथळा, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, एकत्र जमाव करून हाणामारी करणे, अवैध व्यवसाय चालविणे, अशा गंभीर स्वरूपाच्या कलमांचे गुन्हे दाखल केले आहेत. त्यामध्ये सुमारे ५० जणांचा समावेश आहे. पोलिसांनी १८ पानी पंचनामा तयार केला आहे. जास्तीतजास्त पुरावे गोळा करीत अधिक साक्षीदारांचे जबाबही पोलिसांनी घेतले आहेत. 

प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक शर्मा यांचाही जबाब घेतला आहे. हल्ल्यामध्ये शर्मा यांचा बॉडीगार्ड निरंजन पाटील हा जखमी झाला आहे.  मंगळवारी दिवसभर संशयितांची धरपकड सुरूहोती. अजूनही तपास वेगाने केला जात असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक वाढावा व कायद्याची ताकद समजावी यासाठी आता पोलिसांनी कठोर पाऊल उचलले असल्याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले. संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिलेल्या या प्रकरणात संबंधित संशयित गुन्हेगारांवर काय कारवाई होणार हा चर्चेचा विषय बनला होता. 

अटक झालेल्यांची नावे माजी उपमहापौर शमा सलीम मुल्ला (वय ४२), तौफिक सद्दाक शिकलगार (३८, रा. सदर बझार), फिरोज खलील मुजावर (५७), शाहरुख रफीक लाड (वय २४), जावेद शौकत नाचरे (२१), अजय बाळासाहेब कांबळे (वय ४७), शाहरुख रफीक लाड (२४) , उमेर मुजाहिद मोमीन (२०) साहिल नियाज मुजावर (२०), ओंकार रवींद्र पारीसवाडकर (३३), आकाश लक्ष्मण पोवार (१८),रोहित बाळू गायकवाड (४५), टिपू मुल्ला (३०), सुनिल दाभाडे (३५), सज्जाद ईसाक नाईकवडी (५२, सर्व, रा. यादवनगर), दिलीप वामन कवडे (४०, रा. सदर बझार), विजय मारूती सांगावकर (४३, रा. शाहूनगर), अरिफ रफिक शेख (२४, रा. बीडी कामगार वसाहत), जमीर साहेबजी मुल्ला (२८, रा. राजारामपुरी, माउली पुतळा), श्रीधर शिवाजी कांबळे (२३), साहिल आमिन नदाफ (२४), मुश्रीफ पठाण (२१), इमाम आदम शेख (४०, सर्व रा. शास्त्रीनगर), रोहित बाळू गायकवाड (४५) बुधवारी अनेक वृत्तपत्रांनी पोलिसांची गुन्हेगारावरील सुटत चाललेली पकड व पोलिसांच्या आशिर्वादानेच सुरु असलेले हे अवैध धंदे तसेच आता थेट पोलीसच नव्हे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत हल्ला करण्याचे त्यांचे वाढलेले धाडस यावर चांगलेच ताशेरे ओढल्याने संपूर्ण पोलीस दलाची चांगलीच नाचक्की झाली आहे. सर्वसामान्यांना कायदा   व गुन्हेगारांना अभय असाच प्रकार अनेक पोलीस ठाण्यातून सुरु असल्याचे खुलेआम नागरिक बोलत होते. अनेक तक्रारी करूनही अवैध धंदे सुरुच होते. शहरात अजूनही अनेक ठिकाणी विविध अवैध धंदे सुरु आहेत. त्यामुळे पोलिसांनी हा घेतलेला मोका कायद्याचा आधार कितपत यशस्वी होतोय हे महत्वाचे आहे.  पोलिसांनी आपला कायदा सक्षम राबवावा अशीच जनतेतून मागणी आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस