नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 12:17 PM2022-01-19T12:17:08+5:302022-01-19T12:24:37+5:30

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पेटवण्यात आलेला पुतळा वाचवताना पोलिसाचा हात भाजल्याची घटना आज, बुधवारी दुपारी येथील ...

Police burn hand while rescuing burnt statue of Nana Patole, Kolhapur type during BJP agitation | नाना पटोलेंचा पेटवलेला पुतळा वाचवताना भाजला पोलिसाचा हात, भाजपच्या आंदाेलनावेळी कोल्हापुरात घडली घटना

फोटो - आदित्य वेल्हाळ

googlenewsNext

कोल्हापूर : कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पेटवण्यात आलेला पुतळा वाचवताना पोलिसाचा हात भाजल्याची घटना आज, बुधवारी दुपारी येथील बिंदू चौकात घडली.

पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याने त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपच्यावतीने येथील बिंदू चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी पटोले यांच्या पुतळ्याला चप्पलने मारहाण करून नंतर तो पुतळा पेटवण्यात आला. यावर पेट्रोल टाकले असल्याने पुतळ्याने लगेच पेट घेतला. यावेळी जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे हवालदार सुनील आमते यांनी पुतळा विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यातच त्यांचा हात भाजला.

भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, विजय जाधव, अशोक देसाई, तुषार देसाई, हेमंत आराध्ये, सचिन तोडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. पुतळा पेटला तो पेटलाच परंतू या पोलिस कर्मचाऱ्याला हात पोळून घ्यावे लागले. आता थंडी असल्याने या जखमा अधिक त्रासदायक ठरणार आहेत.

Web Title: Police burn hand while rescuing burnt statue of Nana Patole, Kolhapur type during BJP agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.