कुंभोज : कोरोना नियंत्रणासाठी हातकणंगले तालुक्यातील ग्रामपंचायतींकडून कठोर उपाययोजना केल्या जात असताना संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी ग्रामपंचायतींना पोलिसांचे पूर्ण सहकार्य राहील, असे आश्वासन हातकणंगले पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिले. कुंभोज (ता. हातकणंगले) येथे कोरोना योद्ध्यांच्या सत्कारप्रसंगी बोलत होते. शरद साखर कारखान्याचे संचालक आप्पासाहेब चौगुले अध्यक्षस्थानी होते.
वीरसेवा दल तसेच शांतीसागर झांज पथक यांच्यावतीने ग्रामपंचायत तसेच आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी मदतनीस, सफाई कर्मचारी यांना जीवनावश्यक वस्तू भेट देऊन गौरव करणेत आला.
या वेळी सरपंच माधुरी घोदे, उपसरपंच दाविद घाटगे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी ए. एस. कटारे, समीर भोकरे, आदित्य पाटील, विनायक पोतदार, डॉ. आदित्य फडे, पोलीस पाटील महंमद पठाण, तंटामुक्त समिती अध्यक्ष अजित गोपुडगे आदी उपस्थित होते. विनोद शिंगे यांनी प्रास्ताविक तर अनिल भोकरे यांनी आभार मानले.