कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या निर्देशानुसार गडहिंग्लज शहरातील बाजारपेठेतील दुकाने बंद ठेवण्यात आली. मंगळवारी (६) दुपारी पोलिसांनी शहरात फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवण्याची मोहीम राबविली.
आठवड्यातील शनिवारी आणि रविवारच्या बंदची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आजपासूनच बंदची मोहीम शहरात राबविण्यात आली. आठवड्याच्या दर मंगळवारी गडहिंग्लजची बाजारपेठ काही दुकाने वगळता नेहमीच बंद ठेवली जाते. असे असतानाही पोलिसांनी बाजारपेठेत जी काही दुकाने सुरू होती ती देखील बंद केली.
शनिवारी व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. त्यामुळे गडहिंग्लजचा आठवडे बाजार बंद झाला आहे.
मंगळवारी कायमस्वरूपी बंद पाळला जातो. तरी देखील पोलीस प्रशासनाने काही उघडी दुकानेही बंद करण्यास भाग पाडले. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.