एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कडाक्याचा उष्मा सोसत लोकसभा निवडणुकीच्या बंदोबस्तात २४ तास खडा पहारा देताना पोलिसांचे स्वास्थ्य बिघडले आहे. कामाचा अतिरिक्तताणतणाव, त्यात वेळेवर जेवण नाही की झोप नाही, अशा गंभीर अवस्थेत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना निवडणूक बंदोबस्त संपतो कधी याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे; यासाठी पोलीस रात्रंदिवस सुरक्षेसाठी रस्त्यावर तैनात आहेत. त्याच निवडणुकीच्या सुरक्षाव्यवस्थेचा भार उचलणाºया राज्य राखीव दलाच्या पोलिसांची नागपूर येथील विदारक अवस्था समोर आली. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांच्या बंदोबस्ताची माहिती घेतली असता जेवण, राहण्याची सोय चांगली आहे; परंतु वेळेवर जेवण आणि झोपही नसल्याच्या भावना आॅनड्यूटी पोलिसांनी व्यक्तकेल्या. नागपूर, बीड, लातूर, पुणे रेल्वे, वर्धा, ट्रेनिंग कॅम्प येथून १५०० पोलीस कोल्हापुरात बंदोबस्तासाठी दाखल झाले आहेत. तसेच २२४० पोलीस आणि १८०० होमगार्ड तैनात आहेत. निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यासह परजिल्ह्यांतील ५५४४ पोलीस रस्त्यावर २४ तास पहारा देत आहेत. जिल्ह्यात ५८ ठिकाणी पोलिसांच्या छावण्या उभ्या केल्या आहेत. ज्या-त्या ठिकाणी हॉल, टॉयलेट, नाश्त्यासह जेवणाची सोय, पिण्याचे पाणी, अंघोळीसाठी बाथरूम अशी व्यवस्था केली आहे. प्रत्येक कॅम्पमध्ये १०० ते १५० पोलिसांचा समावेश आहे.पोलीस प्रशासनाने सोय चांगली केली असली, तरी निवडणूक सभा, बंदोबस्तामुळे वेळेवर अंघोळ नाही, नाश्त्यासह जेवणाचा तर पत्ताच नाही. २४ तास ड्यूटीवर राहिल्यामुळे पोलिसांचे आरोग्य बिघडत आहे.बापाच्या कडा पानावल्या...शहरातील एका पोलीस ठाण्यातील हवालदाराच्या मुलीचा वाढदिवस होता. पाच मिनिटांत येणारे बाबा मध्यरात्री १२ वाजले तरी घरी आले नव्हते. मध्यरात्री बारानंतर थकलेल्या, दमलेल्या अवस्थेत बाप घरी आला. जन्मदिवसाचा दिवस संपून दुसºया दिवसाची सुरुवात झाली होती. केक कापून पुन्हा तोच बाप बंदोबस्तासाठी रवाना झाला.
निवडणूक बंदोबस्ताने पोलिसांचे स्वास्थ्य हरवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 1:00 AM