कोल्हापूर : चंदगड मतदारसंघात निवडणूक भत्ता मागायला गेलेल्या शिक्षकांना पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड व पोलिसांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार शिक्षक कर्मचाऱ्यांनी केली आहे. या प्रकाराची दखल घेत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेला बुधवारी चौकशीचे आदेश दिले.
लोकसभा निवडणुकीसाठी चंदगड मतदारसंघात गेलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने चांगली वागणूक दिली गेली नाही. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर निवडणूक भत्ता मागण्यासाठी गेलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांना पोलीस निरीक्षक गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा तक्रार केली आहे.
पोलिसांची नेमकी भूमिका काय होती, धक्काबुक्की झाली आहे काय, याबाबत चौकशीचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत चौकशी करीत आहेत. घटनास्थळावरील व्हिडीओ फुटेज, फोटो पाहून खात्री करण्याचे काम सुरू आहे.