कोल्हापूर : अटल चषक फुटबॉल स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने साईनाथ स्पोर्टस क्लबचा सडनडेथवर, तर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ने दिलबहार तालीम मंडळ ‘ब’ संघाचा पराभव करीत आगेकूच केली.शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर शनिवारी दुपारी पहिल्या सामन्यात कोल्हापूर पोलीस संघाने साईनाथ स्पोर्टस क्लबचा १-० असा सडनडेथवर पराभव केला. संपूर्ण सामन्यात पोलीस संघाकडून नितीन रेडेकर, सोमनाथ लांबोरे, युक्ती ठोंबरे, रोहित ठोंबरे, लखन मुळीक, सौरभ पोवार यांनी प्रारंभापासून आक्रमक खेळ केला; पण त्यांना उत्तरार्धात व पूर्वार्धात गोल करण्यात यश आले नाही. उत्तरार्धातही गोलफलक कोराच राहिला. त्यामुळे पंचांनी टायब्रेकरचा अवलंंब केला. यात पोलीस संघाकडून युक्ती ठोंबरे, प्रणव घाटगे, सोमनाथ लांबोरे, रोहित ठोंबरे यांना गोल करण्यात यश आले; तर अभिषेक भोपळेचा फटका वाया गेला. ‘साईनाथ’कडून ओमकार लायकर, आशितोष मंडलिक, सतीश खोत, वीरधवल जाधव यांनी गोल केला; तर हृषिकेश पाटीलचा फटका वाया गेला. त्यामुळे पुन्हा ४-४ अशी बरोबरी झाली. बरोबरीमुळे सामन्याचा निकाल सडनडेथवर घेण्यात आला. त्यात पोलीस संघाच्या सौरभ पोवारने गोल केला, तर ‘साईनाथ’च्या शरद मेढेचा फटका बाहेर गेला. त्यामुळे पोलीस संघाने हा सामना १-० असा जिंकत स्पर्धेत आगेकूच केली.दुसऱ्या सामन्यात कपिल श्ािंदेच्या एक गोलच्या जोरावर खंडोबा तालीम मंडळ ‘अ’ने दिलबहार तालीम मंडळ ‘ब’चा पराभव केला. ३१ व्या मिनिटाला ‘खंडोबा’कडून कपिल शिंदेने मिळालेल्या संधीवर गोल केला. या गोलनंतर दिलबहार ‘ब’कडून ओंकार शिंदेने मारलेला फटका गोलपोस्टला धडकून माघारी आला. त्यामुळे गोल करण्याची संधी वाया गेली. ‘दिलबहार’कडून साईराज वडणगेकर, शुभम माळी व ‘खंडोबा’कडून सिद्धार्थ शिंदे, ऋतुराज संकपाळ यांनी अनेक चढाया करीत गोल करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ‘दिलबहार’चा गोलरक्षक संदेश शिंदे याने ते परतावून लावले. अखेरपर्यंत दिलबहार ‘ब’ संघास बरोबरी न साधता आल्याने हा सामना खंडोबा संघाने १-० अशा गोलफरकाने जिंकला.धसमुसळा खेळ : पाच कार्डधसमुसळ्या खेळाबद्दल पंचांनी ‘खंडोबा’च्या अजीज मोमीन (रेड), विक्रम शिंदेला (यलो), ‘दिलबहार’च्या तुषार देसाई (रेड), मसूद मुल्ला याला दोन यलो कार्ड दिल्याने नियमानुसार रेड कार्ड, अक्षय दळवी याला यलो कार्ड दाखविले. पंचांचा हा निर्णय काही खेळाडूंना खटकल्याने त्यांनी पंचांना शिवीगाळ करीत अंगावर धावून जाण्याचा प्रकार केला. सामना संपल्यानंतर एका संघाच्या खेळाडूंनी के.एस.ए.च्या कार्यालयात घुसून पंचांना शिवीगाळ केली. के.एस.ए.पदाधिकाºयांनी या खेळाडूंना आवरत कार्यालयाबाहेर काढले. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. नंतर तो निवळला.सामनावीर : नितीन रेडेकर (पोलीस), अर्जुन शेटगावकर (खंडोबा)लढवय्या खेळाडू : अश्विन टाकळकर (साईनाथ), साईप्रसाद वडणगेकर
पोलीस, खंडोबा 'अ'ची आगेकूच अटल चषक फुटबॉल स्पर्धा : पंचांना शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 1:09 AM