हातकणंगले तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसीलदार प्रदीप उबाळे यांच्या हस्ते झाला. या ध्वजारोहणास सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मात्र, हातकणंगले पोलीस ठाण्याकडील फक्त पाच पोलीस कर्मचारी हजर होते. अधिकाऱ्यांनी ध्वजारोहणाकडे पाठ फिरवली होती. पोलीस ठाण्याकडे एक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस उपनिरीक्षक असताना या कार्यक्रमाकडे कोणीच फिरकले नाही. ध्वजारोहणाला पोलीस अधिकारी गैरहजर राहिल्याची चर्चा होत आहे.
राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आणि भारतीय संविधानाचा आदर ठेवून प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने ध्वजारोहणासाठी प्रोटोकॉलप्रमाणे हजर राहणे बंधनकारक आहे. पोलीस अधिकारी का गैरहजर राहिले याचा खुलासा संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात येईल.
प्रदीप उबाळे, तहसीलदार हातकणंगले.