शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
4
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
5
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
6
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
7
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
8
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
9
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
10
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
11
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
12
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
13
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
14
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
15
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
16
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
17
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
18
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
19
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
20
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण

ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 12:30 PM

Crimenews, Police, Kolhapur ऑनलाईन जुगार सुरू असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला.

ठळक मुद्दे ऑनलाईन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील घटना आठजणांवर कारवाई; १५ हजारांच्या रोकडीसह संगणक, प्रिंटर, आदी मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : ऑनलाईन जुगार सुरू असलेल्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या जुगार अड्ड्यावर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या पथकाने बुधवारी रात्री छापा टाकला. छाप्यात पोलीस पथकाने विन गेम व विन लकी गेमच्या मालकांसह एकूण आठजणांवर गुन्हे नोंदवले. कारवाईत पोलिसांनी १५ हजारांच्या रोकडीसह सुमारे ३२ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.गुन्हे दाखल केलेल्या संशयितांची नावे अशी : विजय शिवाजी जाधव (३७, रा. नेहरूनगर, आयसोलेशन हॉस्पिटलनजीक), अकबर नबीसो मुल्ला (३७, रा. हुंकार कॉलनी, मणेर माळ, उचगाव), परशराम खिराप्पा किटवाडकर (३२, रा. मु. चिलनवट्टी, पो. आगसगा, ता. बेळगाव, रा. बेळगाव), मंगेश लॉटरी सेंटरचे मालक वैद्य, पंकज (रा. आजरा), सरनाईक (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), विन गेमचा मालक (पूर्ण नावे नाहीत).पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वटेश्वर मंदिरानजीकच्या विजय ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये विनापरवाना विन गेम व विन लकी गेमच्या नावाखाली ऑनलाईन जुगार खेळला जात असल्याची माहिती नूतन शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना मिळाली. त्यांच्या पथकाने बुधवारी रात्री तेथे छापा टाकला. त्यावेळी तेथे लॉटरी सेंटरच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरू असल्याचे दिसून आले.

पोलिसांनी आठजणांवर कारवाई करून छाप्यात सुमारे १५ हजारांची रोकड व १७ हजार ४१० रुपयांचे जुगाराचे साहित्य असा सुमारे ३२ हजारांहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये संगणक, प्रिंटर, की-बोर्ड, मोबाईल संच अशा मुद्देमालाचा समावेश आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरPoliceपोलिस