कोल्हापूर: पोर्ले येथून बेळगावकड़े जाणाऱ्या १९ जणांना शिये फाटा येथे पकडण्यात आले. शिरोली एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी रात्री १.३० वाजता ही कारवाई केली.
हे सर्व जण पोर्ले येथै गवंडी काम कामास असल्याची प्राथमिक माहिती मिळाली. लॉकडाऊन आता काम बंद करण्यात आले आहे. त्यामुळे ते आपल्या गावी जाण्यासाठी मोटारसायकलवरुन जात होते. यावेळी ते महिला, लहान लहान मुल असे 19 जण होते. शिये फाटा येथे आले असता याठिकाणी रस्ता बंद करण्यात आला होता. बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी काहींनी पोलिसांशी हुज्जत घातली तर काहींनी मनधरणी करत आल्या त्या मार्गी परत जातो, अशीही विनवणी केली. परंतु पोलिसांनी ही मागणी अमान्य करत, कर्तव्यात कसूर केली नाही. त्या सर्वांची सविस्तर उशिरा पर्यंत चौकशी करण्याचे काम सुरू होते. हे सर्व गवंडी कुटुंबीय जिथे कामाला होते, त्या मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू होता.
दरम्यान, या कामगार पैकीच आणखी एक चारचाकी गाडीतूनही काही जण पोलिसांना हुलकावणी देत न थांबता पळून गेले. सर्वत्र संचारबंदी सुरू असतानाही अद्यापही काही कामगार वर्ग आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहे. परंतु , लॉकडाऊनमुळे त्यांचा प्रयत्न अयशस्वी होत आहे. तर पोलिसांपुढे असे प्रकार थांबविण्याचे आव्हान वाढतच असून, अशा लोकांना पुन्हा थांबवायचे कोठे, तपासणी या साऱ्या समस्या आहेत.