कोल्हापूर : सीपीआर आवारातील कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत शुक्रवारी मिळालेली दोन अर्भके अनैतिक संबंधातील असल्याचा प्राथमिक संशय पोलिसांचा आहे. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत. अर्भक नेमके कोठून आणले, याचा शोध घेण्यासाठी सीपीआर आवारातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय सीपीआरमध्ये अलीकडे झालेल्या प्रसूतीची माहितीही घेण्यात आली आहे.सीपीआरच्या आवारात दोन मृत अर्भकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याचे निदर्शनास आले. यामुळे दोन अर्भक आले कोठून याचा शोध सुरू आहे. शोध घेताना अवैध गर्भपात, अनैतिक संबंधातील अर्भक आहे का? याचाही तपास पोलिस करीत आहेत. मात्र, पोलिसांना अजून ठोस धागेदोरे लागलेले नाहीत. यामुळे तपासाची अजून नेमकी दिशा निश्चित झालेली नाही. वेगवेगळ्या तर्कसंगतीवर माहिती घेतली जात आहे.अवैध गर्भपात असेल किंवा अनैतिक संबंधातील दोन अर्भके असतील तर सीपीआरच्या आवारात टाकण्यामागचे कारण काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सीपीआर परिसरात अर्भक मिळाल्याने शहर आणि परिसरातील अर्भक असावेत, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
Kolhapur: अनैतिक संबंधातून अर्भक फेकल्याचा पोलिसांचा संशय, कुत्र्याने लचके तोडलेल्या अवस्थेत आढळली होती अर्भके
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2023 12:46 PM