कोल्हापूर : करवीर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५३ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नाकाबंदीसह गस्ती वाढवल्या असून तालुक्यातील सर्व गावांवर नजर ठेवली आहे. तालुक्यातील १०८ गावांत कडेकोट पोलीस बंदोबस्ताचे नियोनज केले आहे, अशी माहिती करवीर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर यांनी दिली.गावपातळीवर ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते. चुरस, इर्ष्या यातून होणारा संघर्ष विचार करून करवीर तालुक्यात १०८ गावांत बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, इस्पूर्ली, कागल पोलीस ठाण्यांना हद्दीतील गावांवर लक्ष ठेऊन येथे नाकाबंदीसह गस्तीवर भर देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. भरारी पथकाद्वारे सर्व गावांवरही नजर ठेवण्यात येत आहे. रात्रीच्या पार्ट्यासह ओपनबारही पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.