शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

पोलिसांना अवैध व्यावसायिकांशी मैत्री पडणार महागात-: पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 1:15 PM

जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. खात्यामध्ये छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढवून हप्ता वसुली करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची गय

ठळक मुद्देकठोर कारवाईचा इशारा

कोल्हापूर : जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची काही भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनामुळे नाचक्की होऊ लागली आहे. खात्यामध्ये छुप्या मार्गाने अवैध व्यावसायिकांशी सलगी वाढवून हप्ता वसुली करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची गय केली जाणार नाही. यापुढे जिल्ह्यामध्ये अवैध धंदे सुरू राहिल्यास संबंधित हद्दीच्या प्रभारी निरीक्षकावर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. 

पोलीस दलात लाचखोरीच्या घटनांमुळे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्याला कलंक लागत आहे. पोलिसांच्या या वरकमाईमुळे परिक्षेत्रात मटका, जुगार, दारू, वेश्या, आदी अवैध व्यवसाय जोमाने सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांशी मैत्रीचे नाते न जोडता गुन्हेगारांशी पोलिसांची सलगी आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पोलिसांवर हल्ला करण्याचे धाडस होत आहे, यापुढे जिल्ह्यात अवैध धंदे सुरू राहणार का? या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर डॉ. देशमुख यांनी सांगितले, कॉन्स्टेबल ते निरीक्षक, पोलीस उपअधीक्षकांपर्यंत खात्यामध्ये अवैध व्यावसायिकांशी संबंध चालणार नाहीत. तसे आढळून आल्यास संबंधितांना जबाबदार धरून कठोर कारवाई केली जाईल. अवैध धंदे पूर्णत: मोडीत काढा, अशा सूचना निरीक्षकांना दिल्या आहेत. 

बहुतांश पोलीस ठाण्यांच्या स्तरावर अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी जातीनिशी लक्ष देत नसल्याने अवैध धंदे वाढत असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. यापुढे एकाही पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे दिसून आल्यास त्यांच्यावर खात्याअंतर्गत कारवाई केलेली दिसून येईल, असेही डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही अवैध व्यावसायिक किंवा गुन्हेगारांना मदत करणाऱ्या काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ रोखली आहे. शोकॉज नोटिसा पाठवून खुलासा देण्याच्या नोटिसा काढल्या आहेत. यापुढे मात्र कठोर कारवाई केली जाईल. २२ क्लबचे परवाने रद्द होणार जिल्ह्यात सांस्कृतिक क्लबच्या नावाखाली जुगार चालविणाºया २४ क्लबविरोधात कारवाई करण्यात आली आहे. त्यापैकी २२ क्लबचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकाºयांना प्रस्ताव सादर केला आहे. सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली बहुतांश क्लबमध्ये जुगारच चालतो, ही वस्तुस्थिती आहे. कर्नाटक सीमेवर हा प्रकार मोठा आहे. जिल्ह्यात मात्र यापुढे कठोर कारवाई झाल्याचे दिसून येईल, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले.  

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर