शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

नोटा गिळून पोलिसाने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:54 AM

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भवानी मंडप परिसरात तक्रारदाराकडून पंधराशे रुपयांची लाच घेतल्यानंतर ‘एसीबी’च्या ट्रॅपची चाहूल लागताच जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने पाचशे रुपयांच्या तीन नोटा गिळल्या. त्यानंतर तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून त्याला पकडले.पोलीस नाईक पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) ...

ठळक मुद्दे पंधराशेची लाच; पाठलाग करून पकडले; ‘जुना राजवाडा’समोरील घटनाअर्ज चारित्र्य पडताळणीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आला. उशिरापर्यंत त्याच्या पोटातील नोटा बाहेर काढण्याचे काम सुरू होते

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : भवानी मंडप परिसरात तक्रारदाराकडून पंधराशे रुपयांची लाच घेतल्यानंतर ‘एसीबी’च्या ट्रॅपची चाहूल लागताच जुना राजवाडा पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने पाचशे रुपयांच्या तीन नोटा गिळल्या. त्यानंतर तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून त्याला पकडले.

पोलीस नाईक पंडित रंगराव पोवार (वय ३५, रा. बालिंगा, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. नोटा गिळल्याने त्याला तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास झालेल्या या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.अधिक माहिती अशी, तक्रारदार हे मेडिकल रिप्रेझेंटिव्ह म्हणून नोकरीस आहेत. त्यांना नोकरीच्या निमित्ताने संधी मिळाली तर परदेशात जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असल्याने दि. २४ जून २०१७ला पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज चारित्र्य पडताळणीसाठी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात आला.

या विभागाकडे पासपोर्ट व्हेरिफिकेशनचे काम पंडित पोवार याच्याकडे आहे.त्याने पासपोर्टचे न होणारे काम आम्ही करून देत आहोत, असे सांगून त्यांच्याकडे दोन हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यावर तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक गिरीश गोडे यांच्याकडे तक्रार केली. सरकारी पंचांसमक्ष तडजोडीअंती पंधराशे रुपयांची मागणी पोवार याने केल्याची खात्री होताच सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास जुना राजवाडा पोलीस ठाण्यात सापळा रचला.

तक्रारदाराने पोवारला फोन करताच त्याने पोलीस ठाण्याच्या समोरच्या चहाच्या टपरीजवळ येण्यास सांगितले. काही वेळाने तो याठिकाणी आला. तक्रारदाराने पाचशे रुपयेच्या तीन नोटा दिल्या. आजूबाजूला सापळा रचून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाला पाहताच नोटा गिळून धूम ठोकली. भवानी मंडप मुख्य कमानीच्या दिशेने तो पळत सुटला. यावेळी थरारक पाठलाग करून त्याला पकडले. तेथून त्याला थेट सीपीआर रुग्णालयात आणले. त्याच्या हाताच्या तळव्याला, पँटला व तोंडाला अँथ्रासिन पावडर लागली होती. हे पाहून त्याची बोलतीच बंद झाली. रात्री उशिरापर्यंत त्याच्या पोटातील नोटा बाहेर काढण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरा त्याच्या घराची झडती घेतली.आठ दिवसांत दोन ट्रॅपमित्राच्या भावाच्या प्रेमप्रकरणात मध्यस्थी केल्याचा तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच घेताना राजारामपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार किरण दत्तात्रय गवळी (वय ४३, रा. फुलेवाडी) याला अटक केली होती. त्यानंतर पंडित पोवारला लाच घेताना कारवाई करण्यात आली. आठ दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दुसरी कारवाई केल्याने पोलीस खात्याची नाचक्की झाली आहे.