शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
2
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
3
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
4
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
5
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
6
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
7
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
9
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
10
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
11
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
12
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
13
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
15
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
16
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
17
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने नोकऱ्यांवर गदा? भारतीय सॉफ्टवेअर इंजिनीअर्सचे भविष्य अंधारात
19
ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड! भारतानंतर IPL लिलावात कोणत्या देशाच्या खेळाडूंची सर्वाधिक नावे?
20
कडक सॅल्यूट! जन्मापासूनच दिसत नव्हतं; नेत्रदिपक कामगिरी करत झाल्या IFS अधिकारी

‘डॉल्बी’ विघ्नावर पोलिसांचा उतारा--लोकमतचा प्रभाव

By admin | Published: July 24, 2014 12:16 AM

मनोजकुमार शर्मा : मंडळांच्या बैठका घेण्याचे आदेश

कोल्हापूर : गतवर्षी सकारात्मक प्रतिसादामुळे यशस्वी ठरलेल्या डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा यंदाही सुरू ठेवण्याचा निर्धार जिल्हा पोलीस प्रशासनाने घेतला आहे. ‘गणेशोत्सवात यंदा ‘डॉल्बी’चे विघ्न’ असे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक यांना तत्काळ कामाला लागण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी आज, बुधवारी दिल्या. गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेली दोन वर्षे डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या पोलीस प्रशासनाला मात्र अद्याप जाग आलेली नाही. पोलीस अधीक्षकांपासून ते पोलीस निरीक्षकांपर्यंतचे सर्व अधिकारी नव्याने कोल्हापुरात रुजू झाल्याने त्यांना गणेशोत्सवाचे गांभीर्य कदाचित लक्षात आले नाही. यापूर्वी सहा महिने अगोदरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिसांकडून प्रबोधन, मंडळांच्या बैठका घेतल्या जात होत्या. यावर्षी एकही बैठक घेण्यात आली नाही. ‘लोकमत’च्या वृत्ताने झोपलेले पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले. डॉ. शर्मा यांनी पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षकांना यंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करा, अशा लेखी सूचना दिल्या. त्यानुसार येत्या काही दिवसांत मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या बैठका, प्रबोधन करण्यासाठी ज्या-त्या पोलीस ठाण्यांचे कर्मचारी बाहेर पडताना दिसणार आहेत. दोन वर्षांत जिल्ह्यातील गणेश मंडळे, तालीम संस्था, राजकीय पक्ष यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा झाला. डॉल्बी न वापरल्याने मंडळांना शिल्लक राहिलेल्या कोट्यवधी रकमेचा अन्य समाजोपयोगी कामांकरिता वापर करता आला. (प्रतिनिधी) लोकांना त्रासदायक वाटणाऱ्या डॉल्बीचा विचार मनात कधीच आणणार नाही. अद्यापही वेळ गेलेली नाही, पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी तालीम-मंडळांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची लवकरात लवकर बैठक घ्यावी, डॉल्बीचे पुन्हा प्रबोधन करावे, याला सर्वांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल. - गजानन यादव, अध्यक्ष, लेटेस्ट तरुण मंडळ डॉल्बी बंद झाल्याने वाजंत्र्यांचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे तरुणांकडून डॉल्बीसाठी आग्रह धरला जात आहे. परंतु आम्ही परंपरेला गालबोट न लागता तरुणांचे प्रबोधन करून यंदाचाही गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्धार करणार आहोत. - वसंत कोगेकरअध्यक्ष, शाहूनगर मित्रमंडळ