संदीप बावचे ।जयसिंगपूर : पोलीस प्रशासनाकडून प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरण विशेष कार्यशाळा राबविली जात आहे. यामध्ये अनेक तक्रारी निर्गत होऊन तक्रारदारांमध्ये तडजोड व योग्य तो निर्णय होत असल्याने ही कार्यशाळा लोकअदालतीप्रमाणे यशस्वी ठरत आहे. यामुळे तक्रारदारांना योग्य तो न्याय मिळून त्यांचा वेळ व पैसा वाचत आहे. त्याचबरोबर पोलिसांच्या कामाचा ताणही कमी होत आहे. ही कार्यशाळा सर्वांनाच लाभदायी ठरत आहे.
विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांच्या प्रेरणेतून जिल्ह्याता तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले जाते. तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून अर्जांचे तत्काळ निर्गतीकरण हा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारच्या तक्रार निवारण दिनामुळे गावागावांतील वाद, समूळ नष्ट होणार आहेत. शिवाय नागरिकांमध्ये सामंजस्य निर्माण होऊन शांतता प्रस्थापित व्हावी, हा उद्देश पोलीस प्रशासनाने समोर ठेवला आहे.शिरोळ व जयसिंगपूर पोलीस ठाण्यांतर्गत देखील प्रलंबित अर्जांचे प्रमाण लक्षणीय असल्याने जयसिंगपूर पोलीस उपविभागीय कार्यालयांतर्गत प्रलंबित तक्रारी अर्ज निर्गतीकरणाची विशेष मोहीम राबविण्यात आली.
शिरोळ पोलीस ठाण्यांतर्गत ११२ प्रलंबित अर्ज निर्गत करण्यात आले. जयसिंगपूर येथेही नुकतीच विशेष कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत सुमारे ९३ अर्जांचे निर्गतीकरण केले. पोलीस प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत तक्रारदारांनी कार्यशाळेस प्रतिसाद दिला. एकूणच पोलीस प्रशासनाने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असला तरी यामध्ये सातत्य ठेवणे गरजेचे आहे.सातत्य महत्त्वाचेग्रामीण व शहरी भागात शांतता राखणे, नागरिकांची मालमत्ता व सुरक्षिततेची जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे. सणासुदीचे दिवस असले तरी चोखपणे कर्तव्य बजावणी करावी लागते. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण असतो. अनेक वर्षांपासून तीच कर्मचाºयांची संख्या पोलीस ठाण्याकडे आहे. अशा कारणांमुळे पोलीस ठाण्याकडे येणारे अर्ज त्याचे निर्गतीकरण होत नसल्याचेही बाब पुढे आली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरू केलेली तक्रार निवारण दिन
तक्रारदारांतून स्वागतगावपातळीवर तक्रारी मिटत नसल्यामुळे अनेकजण पोलीस ठाण्याचा आधार घेतात. किरकोळ कारणावरून होणारी भांडणे, घरातील वादविवाद, वैयक्तिक कारणावरून तक्रारी, यासह अनेक प्रकारचे तक्रार अर्ज पोलीस ठाण्याकडे येत असतात. अशा प्रकारच्या अर्जांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शिवाय ते अर्जांची वेळेत निर्गत होत नसल्यामुळे तक्रारदारांच्या हाती निराशाच येते. त्यामुळे ही विशेष कार्यशाळा निश्चितच लाभदायी ठरत आहे.
कार्यशाळा निश्चितच उपयोगी ठरत आहे.तक्रार निवारण दिनाच्या माध्यमातून शिरोळ, जयसिंगपूर पोलीस ठाण्यातील तक्रार अर्जांची निर्गत झाली असून, नागरीकांचादेखील याला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून तत्काळ कारवाई करून निरसन केले जात आहे.- कृष्णात पिंगळे, पोलीस उपअधीक्षक