शहरं
Join us  
Trending Stories
1
घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
3
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
4
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढली! थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात; प्रशासन 'ॲक्शन मोड'वर
6
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
8
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
9
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
10
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
11
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
12
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
13
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
14
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
15
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
16
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
17
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
18
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
19
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
20
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा

चंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीसाठी राजकीय खलबत्ते जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 2:48 PM

gram panchayat Chandgad kolhapur- चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.

ठळक मुद्देचंदगड तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीसाठी निवडणुकराजकीय खलबत्ते जोरात, राजकीय वातावरण लागले तापू

नंदकुमार ढेरे

चंदगड-चंदगड तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने गावा-गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. शासनाने सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करणार निवडणुकीतील ईर्ष्याच कमी झाली आहे. तालुक्यातील ४१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून गल्लीबोळातील कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे.तालुक्यात राजकीय पक्षापेक्षा गटाच्या राजकरणाला महत्त्व आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी व वैयक्तिक भेटीगाठी घेवून आपली भूमिका मतदारापर्यंत पोहोचविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. आमदार राजेश पाटील यांच्या म्हाळेवाडी व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांच्या बसर्गे, जि. प. सदस्य कल्लाप्पा भोगण यांच्या कोवाड तर माजी सभापती शांताराम पाटील यांच्या धुमडेवाडी, माजी सभापती भरमाण्णा गावडे यांच्या हलकर्णीसह कालकुंद्री, राजगोळी बुद्रूक, मांडेदुर्ग, दाटे, हजगोळी, किणी, मलतवाडी, नांदवडे, शिनोळी व तुडये या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावात निवडणूक होत असल्याने लोकप्रतिनिधींचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.तालुक्यात १५ वर्षापूर्वी भरमू पाटील गट विरुद्ध नरसिंगराव पाटील गट अशी लढत व्हायची. कालांतराने दौलत कारखान्याच्या संघर्षातून गोपाळराव पाटील हे नवे नेतृत्व उदयाला आले. अलिकडच्या दशकात संभाजीराव शिरोलीकर, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, अप्पी पाटील, शिवाजी पाटील ही नवी नेतृत्वे उदयाला आली आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.हजगोळी, हलकर्णी, होसूर, इब्राहिमपूर, कळसगादे, कानडी, करेकुंडी, केरवडे-वाळकुळी, किणी, मलतवाडी, मुगळी, नागवे-ईनाम, कोळींद्रे, नांदवडे, पुंद्रा, सुरुते, शिनोळी खुर्द, तुडये, चिंचणे, बुक्कीहाळ, देवरवाडी, ढोलगरवाडी, धुमडेवाडी, जांबरे, कौलगे, किटवाड, माडवळे, म्हाळेवाडी, पाटणे, सुंडी, तावरेवाडी, कालकुंद्री, कोवाड, राजगोळी बुद्रूक, मांडेदुर्ग, आसगाव, बसर्गे, बागिलगे, बोंजुर्डी, दाटे, दिंडलकोप, घुल्लेवाडी या गावांत निवडणुका होत आहेत.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड