शहरं
Join us  
Trending Stories
1
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
2
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
3
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
4
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
5
माउलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा विठ्ठल रखुमाईलाही अश्रु अनावर झाले, तो आजचाच दिवस!
6
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
7
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
8
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी
9
Maharashtra Politics : राजकीय घडामोडींना वेग !महायुतीतील बड्या नेत्यांची दिल्लीत बैठक होणार;शिंदे दिल्लीला जाणार
10
बावीस वर्षांचे कोवळे वय, तरी इहलोकीचे अवतार कार्य संपवून माउलींनी परलोकीची धरली वाट!
11
"तिने याआधीही ४-५ वेळा...", जिया खान आत्महत्या प्रकरणावर सूरज पांचोलीच्या आईची प्रतिक्रिया
12
पाकिस्तानात जोरदार संघर्ष, ७ दिवसांत १०० मृत्यू; कुर्रम जिल्ह्यात हिंसाचार पेटला
13
महाराष्ट्रात धक्कातंत्र? मुख्यमंत्री भाजपचाच होणार, पण नक्की कोणाला संधी?; पक्षातील ५ नावं स्पर्धेत
14
Cheetah Kuno: कुनोतून आली वाईट बातमी! चित्त्याच्या दोन पिलांचा मृत्यू, मृतदेहांवर जखमा 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
16
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
17
Stock Market Updates: सेन्सेक्स-निफ्टीची फ्लॅट सुरुवात; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये तेजी; ऑटो शेअर्सवर दबाव
18
महायुतीच्या नव्या सरकारमध्ये गृहमंत्री कोण असेल? अजित पवार, एकनाथ शिंदे की....  
19
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
20
देशातील नंबर १ रेस्तराँ कोणतं? Anand  Mahindra यांचीही आहे गुंतवणूक; या यादीत घातलाय धुमाकूळ

विद्यापीठात ‘श्रेय नामावली’वरून राजकारण

By admin | Published: January 05, 2016 1:09 AM

लोकमत हेल्पलाईन न्यूज : वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयातील प्रकार, काही महिन्यांपासून फलक कागदाने झाकला

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामधील वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे दर्शविणारा ‘श्रेय नामावलीचा’ फलक झाकून ठेवण्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही महिन्यांपासून हा फलक कागदाने झाकून ठेवण्यात आला आहे. विद्यापीठातील वि. स. खांडेकर भाषाभवनमधील या संग्रहालयातील संबंधित फलक झाकून ठेवल्याची माहिती एका वाचकाने ‘लोकमत हेल्पलाईन’वर दिली. त्यानुसार या फलकाबाबतची वस्तुस्थिती ‘लोकमत’ने जाणून घेतली. संग्रहालयाच्या उभारणीसाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींची नावे दर्शविणारा श्रेय नामावलीचा फलक संग्रहालयाच्या प्रवेशद्वारातून आत जाताना उजव्या बाजूला लावला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून संबंधित फलक हा कागद लावून झाकण्यात आला आहे. या फलकावर ‘डॉ. सुनीलकुमार लवटे (संशोधन, साधन संग्राहक), पं. ना. पोतदार (वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ), विजय गजबर (आर्किटेक्ट) आणि संग्रहालय उभारणीत योगदान देणाऱ्या अन्य व्यक्तींसह खांडेकर कुटुंबीय’ असा उल्लेख आहे. योगदान देणाऱ्यांना त्यांचे श्रेय देण्याऐवजी हा फलक झाकून ठेवून संबधितांना काय साध्य करावयाचे आहे, असा सवाल काही जणांकडून उपस्थित होत आहे. दरम्यान, झाकून ठेवलेल्या या फलकाबाबत संग्रहालयाच्या संचालक डॉ. पद्मा पाटील यांना विचारले असता त्या म्हणाल्या, संग्रहालयातील विविध छायाचित्रे, वस्तूंची माहिती देणारे फलक मराठी भाषेत आहेत. ‘नॅक’ समितीने भेट दिल्यानंतर हे फलक मराठीसह हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात यावेत अशी सूचना केली. त्यानुसार छायाचित्रे, वस्तू आदींची संबंधित तीन भाषांमध्ये माहिती देणारे फलक बनविले आहेत. अशा पद्धतीने ‘श्रेय नामावली’चा फलक बनविला जाणार आहे शिवाय संग्रहालयातील काही भागाची डागडुजी, रंगरंगोटीचे काम केले जाणार आहे. हे काम झाल्यानंतर सर्व फलक विद्यापीठ प्रशासनाच्या सूचनेनुसार लावण्यात येईल. जाणीवपूर्वक श्रेय नामावलीचा फलक झाकून ठेवलेला नाही.(प्रतिनिधी) श्रेय नामावली झाकणे निषेधार्ह वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय मी सन २००० ते २०००४ या कालावधीत अविश्रांत श्रम, संशोधन करून, साधने जमवून उभा केले आहे. या कार्याबद्दल विद्यापीठाने मानधन देऊ करून देखील मी घेतले नाही. त्यानंतर सुमारे दहा वर्षे संग्रहालयाचे संचालक म्हणून कार्य केले. वि. स. खांडेकर आणि विद्यापीठ यांच्याबद्दल असलेल्या कृतज्ञतेमुळे मानधन घेतले नाही. अशा पार्श्वभूमीवर श्रेय नामावली महिनों-महिने झाकणे अयोग्य असल्याचे मत, संग्रहालयाचे निर्माते आणि माजी संचालक डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, श्रेय नामावली झाकणाऱ्यांचे हेतू स्वच्छ दिसत नाही. माझी याबद्दल खात्री आहे की, श्रेय नामावली झाकण्याचे काम संबंधितांनी कुलगुरू, कुलसचिव, बीसीयुडी यांना अंधारात ठेवून केले आहे. संग्रहालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्वांची नावे अशा पद्धतीने झाकणे हे निषेधार्ह आहे. नवा फलक जरूर लावा; पण... श्रेय नामावलीचा नवा फलक जरूर करावा परंतु; त्यासाठी सध्याचा फलक कागदाने झाकून ठेवण्याची गरज नव्हती. जेव्हा नवा फलक लागेल तेव्हा जुना काढून ठेवता येईल मात्र याठिकाणी तसे घडलेले नाही.