शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

पन्हाळा-शाहूवाडीत श्रेयवादाचे राजकारण : विकासकामांचा बोलबाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 12:15 AM

नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणा त सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आहे, पण ही कामं नेमकी कुणामुळे आलीत याबाबत टोकाचे मतभेद आहेत.या दोन्ही तालुक्यांत अजूनही रस्ते, पाणी, ...

ठळक मुद्देकामांची मंजुरीची पत्रे सुपूर्द करण्याच्या कार्यक्रमांचा धडाकाकामे नेमकी कुणी केली याबाबत संभ्रम

नितीन भगवान ।पन्हाळा : देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सध्या कोणतेही वारे वाहत असले तरी शाहूवाडी-पन्हाळ्याच्या राजकारणात सध्या विकासाचाच बोलबाला आहे. या दोन्ही तालुक्यांत अनेक विकास योजना कार्यान्वित झाल्या आहेत. याबाबत सध्यातरी सगळ्यांचेच एकमत आहे, पण ही कामं नेमकी कुणामुळे आलीत याबाबत टोकाचे मतभेद आहेत.

या दोन्ही तालुक्यांत अजूनही रस्ते, पाणी, वीज यांच्याच समस्या प्रतीवर्षी भेडसावत आहेत. मी हा रस्ता केला. तेथे पाणी योजना आणली. त्या ठिकाणी वीज जोडली, हे आजी-माजी लोकप्रतिनिधी भाषणबाजी करताना सांगत आहेत, पण बहुतेक लोकांचे म्हणणे या तर मूलभूत गरजाच आहेत. मग हा विकास म्हणू शकतोे.

शिवसेनेचे विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांनी रस्त्यांची अनेक कामे आपण मंजूर करून आणल्याचे सांगून संबंधित गावात त्या कामांची मंजुरीची पत्रे सुपूर्द करण्याचा कार्यक्रमांचा धडाका लावला आहे. शिवसेना राज्यात सत्तेत असून नसल्यासारखी आहे. कारण भाजपप्रणीत देवेंद्र फडणवीस सरकारला अपशकुन करण्याची एकही संधी शिवसेनेने गेल्या चार वर्षांत सोडलेली नाही. केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजपप्रणीत सरकारला कुचकामी ठरवण्याची शिवसेनेला विरोधी पक्षांपेक्षा अधिक घाई झाली आहे. युतीतला भागीदार पक्ष म्हणून चांगल्या कामांचे श्रेय घेण्याचा पूर्ण अधिकार शिवसेनेला आहे, पण सरकारविरोधात ज्या मुद्द्यांवर लोकांमध्ये नाराजी आहे, त्याची जबाबदारी मात्र शिवसेनेला घ्यायची नाही. किंबहुना हे सरकार कसे अपयशी आहे, हे सांगण्यास शिवसेना विरोधकांच्या नेहमीच दोन पावले पुढे असते. त्यामुळे या सरकारने काम केलेय का नाही, ते एकदा शिवसेनेला ठरवावे लागणार आहे.

दुसऱ्या बाजूला राज्यातल्या भाजपप्रणीत आघाडी सरकारशी जवळीक असलेले माजी मंत्री विनय कोरे आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गटातूनही ही कामे सरकारच्या माध्यमातून केली आहेत, असे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर या संबंधातल्या पोस्ट त्याच्याकडून मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड होत आहेत. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप्सवर याबाबत समर्थकांमध्ये वादावादीचे प्रसंग उद्भवत आहेत. चौकाचौकांत सुरू असलेल्या डिजिटल बोर्डसमुळे जनता हैराण झाली आहे. त्यात वर्तमानपत्रात परस्परविरोधी बातम्या छापून येत असल्याने लोकांना काही कळेनासे झाले आहे. आता विश्वास तरी कोणावर ठेवायचा, असा प्रश्न लोकांना पडला आहे.

आगामी निवडणुकात भाजप आणि शिवसेनेची युती होण्याच्या शक्यतेबाबत एकमत होणे कठीणही नाही आणि सोपे पण नाही. या पार्श्वभूमीवर सरकारमध्ये सहभागी असलेलेच पक्ष एकमेकांसमोर असतील आणि जी काही विकासकामे झालीत किंवा मंजूर झालीत, ती आपल्यामुळेच झालीत, असे दावे दोन्ही पक्षांकडून होतील. त्यामुळे कामे नेमकी कुणी केलीत, याचा निर्णय जनतेला मतपेटीतून द्यावा लागणार आहे, पण सध्यातरी श्रेयवादाची स्पर्धा एवढी पराकोटीला गेली आहे की, एकाच विकासकामांची दोन दोन उद्घाटने झाली नाहीत म्हणजे मिळविली, अशी स्थिती शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यांत आहे.‘ये पब्लिक हैं, सब जानती हैं’सोशल मीडियाच्या आगमनानंतर लोकांत पण आता जनजागृती जोरदार होऊ लागली आहे. गटातटाचे राजकारण एका बाजूला सुरू असले तरी लोकांना आता दर्जेदार कामे पाहिजे आहेत. निवडणुकीच्या राजकारणाचं अर्थकारण सांभाळताना विकासकामात पूर्वांपार चालत आलेल्या खाबूगिरीला आता चाप लावावा लागणार आहे. कामाचा दर्जा घसरला तर त्याचा जाब जनता निवडणुकीत विचारल्याशिवाय राहणार नाही. विकासाचा सूर्य कुणामुळे का उगवला असेना, आता विकासकामावर होणाºया कोट्यवधीच्या खर्चातून जास्तीत जास्त दर्जेदार कामे झाली तरच खºया अर्थाने शाहूवाडी-पन्हाळ्यात विकासाचा सूर्य उगवला असे म्हणता येईल, अन्यथा ‘ये पब्लिक हंै, सब जानती हंै’, हे सर्वच राजकारणी मंडळींनी लक्षात घेतलेले बरे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर