कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघा(गोकुळ)साठी आता २३ एप्रिलला मतदान होणार आहे. सोमवारी निवडणूक निर्णय अधिकारी अशोक पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यासाठी आज, मंगळवारपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्याचे राजकारण ढवळून काढणाऱ्या या निवडणुकीत संचालक मंडळाच्या अठरा जागा निवडून द्यायच्या आहेत.‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अशोक पाटील यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. त्यांनी ताराबाई पार्कातील पाटबंधारे विभागाच्या सिंचन भवन येथे निवडणूक कार्यालय निश्चित केले. त्यानंतर राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या मार्गदर्शनाने त्यांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार आज, मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली. आज, मंगळवारपासून २३ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. मंगळवारी (दि.२४) अर्जांची छाननी होईल. बुधवारी (दि.२५) उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर ८ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असणार आहे. ९ एप्रिलला ११ वाजता चिन्हांचे वाटप होतील. २३ एप्रिलला सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे. २४ एप्रिलला सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे.
‘गोकुळ’साठी २३ एप्रिल रोजी मतदान
By admin | Published: March 17, 2015 12:35 AM