शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

बेळगावातील जिल्हा, तालुका पंचायतीसाठी उद्या मतदान

By admin | Published: February 11, 2016 10:54 PM

राष्ट्रीय पक्षांची कसोटी : महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी प्रतिष्ठेची निवडणूक

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील तालुका पंचायत व जिल्हा पंचायत निवडणुकीच्या जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी भाषिकांचे प्राबल्य असणाऱ्या भागात आपले उमेदवार निवडून आणणे प्रतिष्ठेचे केले आहे. सध्याचे वातावरण पाहता समिती खानापूर आणि बेळगाव तालुक्यात बाजी मारेल असे दिसते. जिल्ह्यातील तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागांसाठी उद्या, शनिवारी मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा, पोलीस सज्ज झाले आहेत.या निवडणुकीत सर्वच राष्ट्रीय पक्षांनी मतासाठी थैल्या सैल सोडल्या आहेत. मतदारांंना प्रलोभने दाखवून प्रसंगी धाकधपटशा दाखवून मराठी भाषिकांची मते आपल्या पक्षालाच मिळवीत या दृष्टीने त्यांची धडपड सुरू आहे. कन्नडिगांची बाजू घेणारे पोलीसही प्रचाराच्या दरम्यान भलते सलते आक्षेप घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांनी आपली ताकद लावली आहे. इस्लामपूरचे आमदार जयंत पाटील यांनी खानापूर येथील नंदगड, बेळगावातील कडोली बेळगुंदी, सीमा आंदोलनाच्या अस्मितेचे केंद्रबिदू असलेल्या येळ्ळूर गावात जाहीर सभा घेतल्या, तर एकीकरण समितीच्या उमेदवारांसाठी उस्मानाबादचे शिवसेनेचे खासदार प्रा. रवी गायकवाड यांनी मुतगा, किनाये येथे जाहीर सभा घेतल्या. या दोन्हीही नेत्यांनी एकीकरण समितीलाच मतदान करा, असे आवाहन मराठी भाषिक मतदारांना केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अलीकडील आंदोलनात तरुण पिढीचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून आला आहे. त्यावरून बेळगाव आणि खानापूर तालुका पंचायतीवर एकीकरण समितीचा झेंडा फडकेल, असे वातावरण आहे. येळ्ळूर जिल्हा पंचायत मतदारसंघात अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. येळ्ळूर गावाच्या वेशीवर डौलाने फडकत असलेला महाराष्ट्र राज्य फलक २७ जुलैला कर्नाटक सरकारने अन्यायाने काढला. यावेळी कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या नेत्यालाच एकीकरण समितीने तिकीट दिले आहे. त्यामुळे कर्नाटक प्रशासन आणि सरकारच्या विरोधातील सूर दरवेळेप्र्रमाणे मतदानात प्रकट होणार आहे. जे येळ्ळूर गावात पेरल जातंय ते सीमाभागात उगवलं जातंय, अशी भावना आहे. त्यामुळे येळ्ळूरमधला मराठी माणूस आणि एकीकरण समितीची लहर संपूर्ण सीमा भागात उमटत आहे असेच चित्र सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे यंदाच्या तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत मराठी माणसाला घवघवीत यश मिळेल, अशी खात्री राजकीय विश्लेषक देताना दिसत आहेत . महाराष्ट्र एकीकरण समितीत पूर्वीपासूनच दुही आहे. मात्र, त्याचा फटका यंदाच्या निवडणुकीत मराठी माणसाला फारसा जाणवणार नाही. राष्ट्रीय पक्षांच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास मागील वेळेस बेळगाव तालुका आणि जिल्हा पंचायतीवर भाजपचे वर्चस्व होते. मात्र, गेल्या पाच वर्षांत तालुका आणि जिल्हा पंचायतीच्या माध्यमातून भाजपने म्हणावा तेवढा जनसंपर्क ठेवला नाही. या नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो. भाजप आणि काँग्रेसच्या लढाईत बेळगाव आणि खानापूर तालुक्यात मराठी माणसाचं नेतृत्व करणारी एकीकरण समिती बाजी मारेल यात शंका नाही. समितीची कसोटीबेळगाव तालुका पंचायतीत एकूण ४५ सदस्य आहेत. त्यापैकी मराठीबहुल ३२ ठिकाणी, तर खानापूर तालुक्यातील एकूण २५ पैकी २० ठिकाणी एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. बेळगाव जिल्ह्णातील जिल्हा पंचायतीच्या एकूण ९० जागांपैकी बेळगावमधील १२ पैकी १०, तर खानापूरमध्ये एकूण सहापैकी ५ जागांवर एकीकरण समिती निवडणूक लढवत आहे. जिल्हा पंचायतीच्या दृष्टिकोनातून बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतील एकूण १८ जागांपैकी दहा जागांवर जरी एकीकरण समितीचे उमेदवार निवडून आले तरी ते किंगमेकरची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांनी निवडणुकीचे मैदान एकतर्फी मारण्यासाठी कंबर कसली आहे. भाजपने आपल्या राज्य आणि केंद्रीय पातळीवरील नेत्यांना तालुका, जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आणले होते. तालुका पंचायतीच्या ३४५, तर जिल्हा पंचायतीच्या ९० जागामहाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षांची ताकद येळ्ळूरमध्ये कानडी पोलिसांचा लाठी हल्ला सहन केलेल्या अर्जुन गोरलसारख्या अनुभवी नेत्याला समितीने तिकीट दिले आहे.