कोल्हापूर : पक्षीय तसेच आघाड्यांच्या राजकारणामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली कोल्हापूर महापालिकेची आठवी पंचवार्षिक निवडणूक सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली. निवडणूक कार्यक्रमानुसार शहरातील ८१ प्रभागांत १ नोव्हेंबरला मतदान होईल, तर २ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून निवडणुकीचे निक ाल घोषित केले जातील. निवडणूक जाहीर झाल्यामुळे महापालिका हद्दीत मध्यरात्रीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.कोल्हापूर महानगरपालिका विद्यमान सभागृहाची मुदत १५ नोव्हेंबरला संपत असून, तत्पूर्वी नवीन सभागृह अस्तित्वात येणे अपेक्षित आहे. त्यामुळेच जसा आॅगस्ट महिना उजाडला, तशी तमाम शहरवासीयांना निवडणुकीच्या तारखेविषयी मोठी उत्सुकता लागून राहिली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून तर कधी घोषणा होणार हाच उत्सुकतेचा विषय होता; पण सोमवारी राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून ही उत्सुकता संपुष्टात आणली. राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी पत्रकार परिषदेत निवडणुकीची तारीख जाहीर केली.माघारीसाठी होणार तारांबळमहापालिकेची गत निवडणूक ३१ आॅक्टोबर २०१० ला झाली होती. १ नोव्हेंबरला मतमोजणी झाली होती. यावेळेला १ नोव्हेंबरला मतदान व २ नोव्हेंबरला मतमोजणी होत आहे. निवडणूक एक दिवसाने पुढे गेली असली, तरी माघारीची मुदत मात्र तीन दिवसांनी कमी झाली आहे. त्यामुळे माघारीसाठी इच्छुकांची चांगलीच तारांबळ होणार आहे. गेल्या निवडणुकीत अर्ज भरण्याची मुदत ६ ते १३ आॅक्टोबर व छाननी १४ आॅक्टोबरला होती. ती यावेळेलाही कायमच आहे. गत निवडणुकीत माघारीची मुदत १९ आॅक्टोबरपर्यंत होती. ती यावेळेला तीन दिवसांनी कमी करून १६ आॅक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यात १३ ला घटस्थापना आहे.आठवी निवडणूककोल्हापूर महानगरपालिकेची ही आठवी सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक आहे. त्यासाठी नव्याने प्रभाग रचना करण्यात आली आहे. शहरातील एकूण ८१ प्रभागांत ही निवडणूक होणार असून, त्यातील पन्नास टक्के म्हणजे ४१ महिला निवडून येणार आहेत. शहर हद्दीत चार लाख ५० हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. अंतिम मतदार यादी ३ आॅक्टोबरला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जातीच्या दाखल्याबाबत निवेदन आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना ते जेव्हा उमेदवारी अर्ज भरतील, त्या दिवशी उमेदवारी अर्जासोबत जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे; परंतु ते नसल्यास जात पडताळणी समितीकडे पडताळणीकरिता सादर केलेल्या अर्जाची सत्य प्रत किंवा अन्य कोणताही पुरावा सादर करावा लागणार आहे व निवडून आल्यानंतर सहा महिन्यांच्या आत वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.पदाधिकाऱ्यांच्या सुविधा काढून घेण्याचे आदेशसोमवारी दुपारी निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री बारा वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे महानगरपालिका पदाधिकाऱ्यांना दिलेल्या वाहन तसेच मोबाईलसह अन्य सुविधा काढून घेण्याचे आदेश आयुक्त पी. शिवशंकर यांनी तत्काळ दिले.
मनपासाठी १ नोव्हेंबरला मतदान
By admin | Published: September 29, 2015 12:50 AM