राम मगदूम -- गडहिंग्लज --सन्माननीय तडजोड न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी, तर कुणाशी युती होवो अगर न होवो जनता दलच बहुमताने विजयी होईल, असा दावा अॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केला आहे. यावरून दोघांचीही ‘स्वबळावर’च लढण्याची तयारी दिसते. त्यामुळे दोघेही स्वबळावर लढले, तर मग आघाड्या कुणा-कुणाच्या होणार? याचीच चर्चा सुरू झाली आहे.गेल्यावेळच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी ‘जनता दल-जनसुराज्य’कडून राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता काढून घेतली. मात्र, साडेतीन वर्षांनंतर त्यांच्याच एका नगरसेविकेच्या पाठिंब्याने ‘जनता दला’ने पुन्हा पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. किंबहुना, ५ वर्षांत राष्ट्रवादी व जनता दल दोघांनाही सत्ता मिळाली.नवीन प्रभागांची रचना आणि वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होईपर्यंत असणारी दोन्ही पक्षांची मानसिकता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर बदलली आहे. त्यामुळेच त्यांनी परवाच्या पालिकेच्या सभेत ‘समजूतदार’पणाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. दोघांनाही थेट नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचीच प्रतीक्षा आहे. त्यानंतरच त्यांची ‘नेमकी’ भूमिका आणि ‘खरी’ वाटचाल स्पष्ट होणार आहे. नगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी व जनता दल यांची गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत युती झाली. तेव्हापासूनच गडहिंग्लज शहर व तालुक्याच्या राजकारणातही युती कायम राहणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीच्या काही ‘नाराज’ मंडळींनी स्वबळाचा नारा सुरू केला. मुश्रीफांनी पत्रकार परिषद घेऊन, तर शिदेंनी पक्षाची बैठक घेऊन ‘आपली भूमिका’ स्पष्ट केली आहे. त्यामुळेच दोन्ही बाजंूचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.केवळ ‘बी. टी.’च स्वबळावर२००५ मध्ये काँगे्रसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष बी. टी. पाटील-गिजवणेकर यांनी ‘काँग्रेस’ पक्षाचे पॅनेल स्वबळावर निवडणुकीत उतरविले होते. त्यापूर्वी डॉ. घाळींनीही एकदा असा प्रयोग केला होता. त्यानंतर गतवेळी सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या विरोधात मुश्रीफ-कुपेकर व शहापूरकर यांची आघाडी होती. सर्वांनीच आपापल्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती.
मल्लेवाडी, बेरकळवाडीतील तलाव फुटले
By admin | Published: July 19, 2016 11:08 PM